शास्त्र विषयांत पुराणिक सराच्या नावाने शिष्यवृत्ती देणे हीच खरी आदरांजली असेल- उल्हास कोल्हटकर

17 Nov 2021 20:22:03

subhadarwada photo_1 

 
 
 
कल्याण : जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट या संस्थेत केंद्रीय पातळीवर शास्त्र विषयांत गुरूवर्य कै. सी. एम. पुराणिक यांच्या नावाने शिष्यवृत्ती देणे यासारखे अनेक उपक्रम राबविणे हीच सरांना खरी आदरांजली असेल असे मत जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केले.

जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट च्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा सुभेदारवाडा या शाळेचे सी.एम.पुराणिक पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा असे नामकरण करण्यात आले. हा नामकरण सोहळा नुकताच सुभेदारावाडा विद्या संकुलाच्या प्रागंणात पार पडला. यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर बोलत होते. गुरूवर्य कै. सी. एम. पुराणिक 1961 पासून त्यांच्या अखेरच्या श्वासार्पयत अव्याहतपणे संस्थेसाठी कार्यरत होते. शिक्षक ,पर्यवेक्षक, संस्थेचे पदाधिकारी, कोषाध्यक्ष आणि नंतर प्रमुख मार्गदर्शक अशा विविध भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. शाळेमध्ये मराठी माध्यमाचे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग सुरू करण्यामागे त्यांचे द्रष्टे नेतृत्व होते आणि म्हणूनच शाळेला त्यांचे नाव देऊन शाळा तसेच संस्थेच्या प्रती त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदान करता संस्थेने त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला आहे. पुराणिक यांच्या कुटुंबियांच्या हस्ते शाळेत देवी सरस्वतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुराणिक यांचे तैलचित्र, शाळेचा सी.एम. पुराणिक पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा असा नामफलक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शाळेचा इतिहास सांगणारा ‘अशी आमची शाळा’ हा फलक याचे अनावरण यानिमित्ताने करण्यात आले. पुराणिक यांच्याविषयी प्रेम आणि आदर भाव दर्शविणारी, त्यांच्या स्मृतीना उजाळा देणारी चित्रफीत आणि त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारी चित्रफीत ही यानिमित्ताने प्रदशिर्त करण्यात आली. गुरूवर्य सी.एम. पुराणिक स्मरण विशेषांकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वास्तुविशारद व शाळेच्या माजी विद्यार्थिनी साधना वैद्य, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटक र, संचालक प्रसाद सरदेसाई, संचालक राधाकृष्ण पाठक, पुराणिक कुटुंबीय, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

डॉ. कोल्हटकर म्हणाले, विज्ञान विषयक ग्रंथालय सुरू करणे, व्याख्यानमाला, शिक्षक प्रशिक्षण, क्लाऊड नॉलेज बॅक सुरू करणो असे उपक्रम राबविणे हीच पुराणिक यांना खरी आदरांजली असणार आहे.

साधना वैद्य यांनी शाळेला समर्पित असलेल्या पुराणिक सरांना श्रध्दांजली म्हणून संस्थेसाठी योगदान देण्याची तयारी दर्शविली.
------------------------------------------------------------
Powered By Sangraha 9.0