आता जागतिक क्रिकेटवरही दादाचा दबदबा ; ICCच्या अध्यक्षपदी निवड

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर मोठी जबाबदारी

    दिनांक  17-Nov-2021 17:49:01
|

Ganguly_1  H x
नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आता जागतिक क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्याला आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. यापूर्वी गेली ९ वर्षे भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे या पदाचा कारभार सांभाळत होता. परंतु, दादाच्या या पदावर निवड झाल्यामुळे आयसीसीवर पुन्हा एकदा भारतीय दबदबा राहणार आहे.
 
 
भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आयसीसी बीसीसीआयलाही पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. वेस्टइंडीजच्या क्लाइव लॉयडच्या जागी अनिल कुंबले यांना २०१२ साली आयसीसी क्रिकेट समितीचे चेअरमन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा २०१६ साली त्यांनी त्याच पदासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा २०१९ साली त्यांच्या पदाच्या कार्यकाळात तीन वर्षांची वाढ करण्यात आली. त्यानंतर आता आयसीसीने गांगुलीला अध्यक्षपदी बढती दिली आहे. ते यापूर्वी आयसीसीचे निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
 
 
 
२०२४ ते २०३१ या कालखंडात भारतामध्ये ३ आयसीसी स्पर्धा होणार आहेत. भारतामध्ये २०२६ साली टी२० विश्वचषक, २०२९मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०३१ साली एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांसाठी बीसीसीआयला दिलासा मिळाला आहे. या सर्व स्पर्धांसाठी आयसीसी भारत सरकारला १० टक्के टॅक्स देण्यास तयार झाले आहे. त्यामुळे बीसीसीआयचे १५०० कोटी वाचणार आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.