नांदेड : मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यात कारवाई करत तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. बारा चाकी ट्रक १५ नोव्हेंबरला मुंबई एनसीबीने ताब्यात घेतला आहे . तसेच २ आरोपींना अटक केली आहे.आता आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिलीय.ही कारवाई मुंबई एनसीबीला मिळालेल्या गुप्त सूत्रांवरून केली गेली. ही मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे.
क्रांती रेडकरने या बातमीवर ''ना रुकेंगे, ना थमेंगे" ट्विट करत समीर वानखेडे यांना विरोध करणाऱ्यांच्या चांगलीच चपराख मारली आहे.
इंस्टाग्राम अकाऊंटवरूनही याबबत बोलताना त्यांनी “काम बोलता है, डायलॉगबाजी नही” असं कॅप्शन दिलंय.मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर नायगाव तालुक्यातील मंजराम येथे कारवाई केली. ट्रकमधील हा गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तिथे याचा पुरवठा करून नंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा पुरवठा केला जाणार होता.यामागे कोण आहे ? आणि याचा पुरवठा कोणाला होणार होता ? गांजा आला कोठून ? अश्या प्रश्नांचा शोध मुंबई एनसिबी घेत आहे.