मालवणीमध्ये धर्मसमाजशक्ती केंद्र

17 Nov 2021 13:15:47

manglam_1  H x
 
मालवणी मालाडजवळील राठोडी येथेे विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांतातर्फे मंदिर आणि समाजकेंद्र भूमिपूजनाचा कार्यक्रम दि. १५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे सहमंत्री मोहन सालेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक पदाधिकारी अरविंद दुबे आणि भगवान ठाकूर उपस्थित होत आणि उपस्थित होते. या उपक्रमाचे महत्त्व धर्मसमाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.






त्यासंदर्भात घेतलेला संक्षिप्त आढावा. २०१८ पासून मालवणी म्हटले की, डोळ्यांसमोर प्रसार माध्यमातल्या ‘त्या’ बातम्या तरळायच्या. मालवणीतील हिंदूंचे पलायन, नवबौद्ध समाजबांधवांचे प्रश्न गंभीर, रस्त्याच्या लगतच अनधिकृत मशिदी आणि त्यावर उठलेले वाद. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल. विविध सामाजिक संघटनांनी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिथे केलेले सर्वेक्षण, ‘सत्यशोधन अहवाल.’ येथील शोषित, पीडित जनतेने उभारलेल्या लढ्याला मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दिलेली समर्थ साथ. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात लावलेला बंदोबस्त आणि प्रशासनाने केलेली कारवाई वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. या सगळ्या घटनाक्रमात विविध कारणांनी साक्षीदार राहिल्यामुळे ‘मालवणी पॅटर्न’ काय आहे, याबद्दल चांगलीच माहिती आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांताने याच मालवणीमध्ये एक हजार चौरस फूट जागा खरेदी केली. तिथे श्रद्धा, आस्थेचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून मंदिर उभारण्याची तयारी केली.







त्या मंदिराच्या जागेचे भूमिपूजन केले. ही गोष्ट येथील आस्थाशील धर्मबांधवांसाठी खूप आनंदाची आणि प्रेरणेची होती. कारण, कधीकाळी मालवणीत बहुसंख्य असलेला हिंदू पुढे असंख्य कारणामुळे इथून विस्थापित होत गेला. कधी स्वेच्छेने, तर कधी अनिच्छेने, पण हिंदू समाजाची घर कमी होत गेली. मालवणीतल्या विशिष्ट भागात घर घेण्यास खरेच समाजातला मोठा गट उत्सुक नाही. पुढे परिषदेला माहिती मिळाली की, मालवणीमधील एक बांधव आपली जागा विकत आहे. विकणारा हिंदू आणि खरेदी करणारा मुस्लीम. विश्व हिंदू परिषदेलाही मालवणीमध्ये धर्मसमाज केंद्र उभारायचे होतेच. त्यामुळे त्यांनीही या जागा खरेदीसाठी स्वारस्य दाखवले. विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांत पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रद्धाशील नागरिक यांच्या लोकवर्गणीतून पैसे गोळा झाले. त्या पैशांमधून विश्व हिंदू परिषदेने ही जागा खरेदी केली. येणार्‍या काळात इथे समाजकेंद्र उभे राहणार आहे. महिला बाल सबलीकर, शोषित-वंचित गटांच्या हितासाठी कार्य, धर्मकार्य इत्यादी अनेक विषयांवर या समाजकेंद्रामार्फत सेवाकार्य सुरू होणार आहे. मालवणी येथे उभे राहणारे धर्मसमाजशक्ती केंद्र म्हणजे मालवणीच्या धर्मसमाज विकासाची नांदीच आहे.






मालवणीमधील सामाजिक समस्या यावर मी वैयक्तिकरीत्या सर्वेक्षण केले. त्यामध्ये जाणवले की, धर्माची श्रद्धाच माणसाचे रक्षण करते. इथे संघटितरीत्या समाजगट समाजबांधव उभा राहिला. त्याला मानसिक आधार मिळाला, तर त्याच्या जगण्याला बळ येईल. त्यामुळेच इथे धर्मसमाजशक्ती केंद्र उभे करण्याचे ईश्वरीय कार्य उभे राहत आहे.



- मोहन सालेकर, विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांत सहमंत्री






Powered By Sangraha 9.0