दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य नाही भीक मिळाली : कंगना रानौत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2021
Total Views |

Kangana_1  H x
 
 
नवी दिल्ली : गेले काही महिने अभिनेत्री कंगना रानौत ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक लेख शेअर करत लिहिले की, "सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांना कधीच महात्मा गांधींकडून पाठींबा मिळाला नाही. दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही." असे म्हणत तिने महात्मा गांधींची खिल्ली उडवली आहे. पुढे तिने म्हंटले की, हिरो निवडताना विचार करा असा सल्ला दिला. तसेच, महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असेही म्हटले आहे.
 
 
कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा फोटो शेअर केला. "गांधी आणि इतर, नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसेच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल, असा करार केल्याचा दावा आहे.‘तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या’ असे तिने हा फोटो शेअर केला आहे.
 
 
कंगनाने म्हंटले आहे की, "स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती. हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा."
 
 
पुढे तिने म्हंटले आहे की, "महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती असे काही पुरावे दर्शवतात. त्यामुळे तुम्ही तुमचे हिरो योग्यपणे निवडले पाहिजेत. कारण या सर्वांना तुमच्या आठवणींच्या एकाच बॉक्समध्ये ठेवणे आणि प्रत्येक वर्षी जयंतीला शुभेच्छा देने पुरेसे नसून खरेतर मूर्खपणा, बेजबाबदारपणा आहे. प्रत्येकाला आपला इतिहास आणि आपले हिरो माहिती असायला हवेत."
 
 
@@AUTHORINFO_V1@@