चांगल्या आरोग्यासाठी धावणे ही काळाची गरज

16 Nov 2021 21:33:22

ए नारायण स्वामी _1 &
 
 
 पुणे : क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतीगुरू लहुजी वस्ताद जयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथॉन स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला होता.

भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायण स्वामी यांनी झेंडा दाखवून तसेच मशाल पेटवून या मॅरेथॉनची सुरूवात केली . या प्रसंगी आमदार सुनील कांबळे, आयोजक प्रकाश वैराळ, सुनील खंडागळे उपस्थित होते. स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा ते संगमवाडी लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती स्थळापर्यंत ही मॅरेथॉन पार पडली. या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तरुण व तरुणींचा सहभाग मोठया प्रमाणात होता. या प्रसंगी बोलताना ए नारायण स्वामी म्हणाले की, ''आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. चांगल्या आरोग्यासाठी रोज ३० ते ४० मिनिट देणे गरजेचे आहे''. स्पर्धेचा समारोप संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतीस्थळापाशी झाला. सहभागी झालेल्या स्पर्धांकांचा श्रीफळ सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाहक महेश करपे ,पुणे विद्यापीठ समिती व्यसवस्थापन समिती सदस्य सुधाकर जाधवर, पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे मा आमदार सुनिल कांबळे, पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगदीश मुळीक , अशोक लोखंड आणि सुनील भंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Powered By Sangraha 9.0