मणिपूरात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला ; ५ जवान हुतात्मा

13 Nov 2021 16:14:46

manipur_1  H x
नवी दिल्ली : शनिवारी १३ नोव्हेंबर रोजी मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला. यामध्ये आसाम रायफल्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह ५ सैनिक हुतात्मा झाले आहेत. तर, त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बायको आणि मुलाचाही या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला आहे. संपुर देशातून या हल्ल्याचा निषेध होत आहे. तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी, हा हल्ला भ्याडपणाचा असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
 
चुराचंदपूर जिल्ह्यातील सिंगत येथे ही घटना घडली. याठिकाणी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला केला आणि आयईडी हल्ला केला. ४६ आसाम रायफल्सचे वरिष्ठ अधिकारी कर्नल विप्लव त्रिपाठी यांची पत्नी आणि मुलगाही या हल्ल्यात हुतात्मा झाले आहेत. कर्नल त्रिपाठी हे छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्याचे रहिवासी होते. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. "या हल्ल्यामध्ये कमांडिंग ऑफिसर आणि त्यांचे कुटुंबीयही मारले गेल्याची बातमी त्यांना मीडिया रिपोर्ट्सवरून मिळाली होती, असे त्यांनी सांगितले. राज्य पोलिस आणि निमलष्करी दहशतवाद्यांशी सामना करत आहेत. हल्लेखोरांना सोडणार नाही."
 
Powered By Sangraha 9.0