अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत ३ दिवसांची वाढ

12 Nov 2021 14:35:07

anil deshmukh_1 &nbs



मुंबई:
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसाने वाढला आहे. म्हणजे त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएमएलए सत्र न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. 6 तारखेला त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले आले असता १२ नोव्हेंबरपर्यंत देशमुखांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.


यावेळी देशमुख ईडीला पूर्ण सहकार्य करत असून जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. तर ईडीच्या वकिलांनी देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्यांना कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना १५ नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे देशमुख यांना तीन दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.


Powered By Sangraha 9.0