झोपडपट्टी वासियांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार : खा.गोपाळ शेट्टी

11 Nov 2021 23:35:53
 
 
shetty_1  H x W
 
 
मुंबई : उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसन आणि मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा दिशेने एक मोठ्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. शहरात अनेक वर्षांपासून लाखो लोक हे झोपडपट्टीत राहत असून त्या झोपडपट्टी वासियांचा आवाज आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की पोहोचविणार आहोत, असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे. गुरुवार, दि. ११ नोव्हव्हेम्बर रोजी खा.शेट्टी यांनी मुंबईतील झोपडपट्टी वासियांच्या प्रश्नावर मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
खा.गोपाळ शेट्टी म्हणाले की, "झोपडपट्टी वासियांच्या मागण्यांसाठी करण्यात येत असलेल्या या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. पण शासनातर्फे जे काही निर्णय घेण्यात आले आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून येणे अपेक्षित होते, पण हे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेऊन जाहीर केले. त्यामुले आता गृहनिर्माणमंत्र्यांनी जाहीर केलेले निर्णय आता मुख्यमंत्री व राज्य सरकारकडे शिक्कामोर्तब करण्यासाठी जाणार आहे," असा टोलाही खासदार शेट्टी यांनी लगावला.
 
 
 
झोपडी धारकांना फोटो पास द्या
"महत्त्वाची मागणी म्हणजे २००० ते २०११ या दरम्यान उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्या आणि संबंधित झोपडपट्टीवासीयांना घर देत असताना ज्यांनी ते विकत घेतले आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये. त्यासाठी पात्र असलेल्या सर्व झोपडीपट्टी धारकांना एक फोटो पास देण्यात यावा ज्यामुळे नवीन झोपडे उभे होणार नाही. २०११ पर्यंतच्या सर्व झोपडी धारकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा देण्यात यावी आणि एक ओळखपत्र देण्यात यावे म्हणजे जेणेकरून त्यांना भविष्यात कधीही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा त्रास त्यांना भोगावा लागणार नाही, असेही खा.गोपाळ शेट्टी यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
हक्काच्या घरासाठी तातडीनं निर्णय घ्या
राज्य मंत्रिमंडळाकडे हा निर्णय शिक्का मोर्तब करण्यासाठी जाणार आहे. तेव्हा खा.शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडे मागणी केली आहे की, २०११ पर्यंतच्या पात्र असलेल्या लोकांना घर देताना सोबत पहिल्या मजल्यावर असलेल्या लोकांना ही हक्काचे घर मिळावे यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
 
 
 
 
झोपडपट्टीवासीयांना सशुल्क घर देताना २.५० लाख रुपये भरण्याची मुभा देत असताना ट्रांसफर मध्ये लाखो रुपयांची रक्कम भरून घर घेतल्यांचाही विचार करावा. एसआरएमध्ये इमारत बांधताना झोपडपट्टीवासियांचे मेंटेनन्स विकासक भरतात पण आता ज्यांना सदनिका २.५० लाखाचे सशुल्क मिळणार त्यांचे मेंटेनन्स एसआरएने स्वतः भरून द्यावे अशी ही मागणीदेखील खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0