नवाब मलिकांविरोधात मुंबई भाजप आक्रमक

11 Nov 2021 00:02:12
 
lodha_1  H x W:
 
 
 
मुंबई : गेल्या महिनाभरापासून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची मोठी शृंखला तयार झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई एनसीबी विरुद्ध नवाब मलिक असा रंगलेला हा वाद नवाब मलिक विरुद्ध भाजप या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. त्यातच नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे मलिक हे भाजपच्या निशाण्यावर आले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वतीने देखील मालिका यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार, दि. १० नोव्हेंबर रोजी मुंबई भाजपच्या वतीने नरिमन पॉइंट येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय परिसरात नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
 
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या. तसेच नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
 
 
 
मुंबई भाजपपातर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, आमदार राहुल नार्वेकर, मुंबई भाजप सचिव प्रतिक कर्पे, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, भायखळा विधानसभा मंडळ अध्यक्ष नितीन बनकर तसेच इतर भाजप नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
  
यावेळी बोलताना आ.मंगल प्रभात लोढा म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर व त्यांच्या कुंटुबावर मंत्री नवाब मलिक बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांचा हा अपमान भाजपचा कोणताही कार्यकर्ता सहन करू शकत नाही. एक महिन्यापासुन राजकीय पक्षातील नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर नवाब मलिक सोशल मीडीया व प्रसार माध्यामाच्या माध्यमांतून खोटे व तथ्यहीन आरोप करत असुन हे राजकारणाला काळीमा फासणारे कृत्य आहे," अशी टीका आ.लोढा यांनी यावेळी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0