हिंदुत्व आणि बोको हराम, इसिस सारखेच – सलमान खुर्शिद यांची मुक्ताफळे

हिंदूंचा अपमान करणे हिच काँग्रेसची विचारसरणी – भाजपची टिका

    दिनांक  11-Nov-2021 19:37:36
|
salman_1  H x W

‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकात वादग्रस्त लिखाण
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम आणि इसिस या इस्लामी दहशतवादी संघटनांसोबत केली आहे. त्यावर हिंदूंचा अपमान करणे हिच काँग्रेसची विचारसरणी आहे, असा टोला भाजपने लगाविला आहे
 
.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यामध्ये हिंदुत्वाविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. त्याचप्रमाणे या पुस्तकामध्ये सलमान खुर्शिद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त मजकूर लिहिला आहे. पुस्तकातील एका प्रकरणात त्यांनी “साधुसंत ज्या सनातन आणि शास्त्रीय हिंदुत्वासाठी ओळखले जातात त्यास बाजुला सारण्यात आले आहे. त्याऐवजी इसिस आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामी संघटनाप्रमाणे राजकीय हिंदुत्वास पुढे आणले जात आहे”, असा उल्लेख केला आहे.
 
 
book_1  H x W:  
 
 
भाजपने यास जोरदार आक्षेप घेतला असून राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकारपरिषदेत टिका केली. ते म्हणाले, यया पुस्तकामुळे केवळ हिंदूंच नव्हे तर भारताच्या आत्म्याचा अपमान केला आहे. भारतात राहून, भारतीयांकडून सन्मान प्राप्त करूनही हिंदूंचा अपमान करण्याची विचारसरणी काँग्रेसनी स्विकारली आहे. देशाच्या विकासात आणि देशास अखंड ठेवण्यात देशातील बहुसंख्यांक हिंदूंचे मोठे योगदान आहे. मात्र, त्या योगदानाचा अपमान करण्याचे काम सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरून वारंवार केले जात असते. हिंदूंविषयी कोळ्याप्रमाणे द्वेषाचे जाळे विणण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत असल्याचेही भाटिया यांनी यावेळी म्हटले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.