कॅनडात तस्करी झालेली अन्नपूर्णेची मूर्ती १०० वर्षांनी पुन्हा भारतात

काशी विश्वनाथ मंदिरात होणार विधीवत पुर्नप्राणप्रतिष्ठा

    दिनांक  11-Nov-2021 19:57:35
|
kashi_1  H x W:


गेल्या सात वर्षांत ४२ मूर्त्या पुन्हा भारतात
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : वाराणसी येथून तस्करी करून १०० वर्षांपूर्वी कॅनडा येथे तस्करी करण्यात आलेली देवी अन्नपूर्णेची मूर्ती अखेर भारतात परत आणण्यात आली आहे. येत्या १५ नोव्हेंबर रोजी काशी विश्वनाथ मंदिरात मूर्तीची पुर्नप्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
 
 
देवी अन्नपूर्णेची मूर्ती १९१३ साली काशीमधील एका घाटावरून चोरण्यात आली आणि तिची कॅनडामध्ये तस्करी करण्यात आली होती. तेथे ही मूर्ती रेझिना विद्यापीठातील संग्रहात समाविष्ट करण्यात येऊन मँकेंझी आर्ट गॅलरीमध्ये ती ठेवण्यात आली होती. या आर्ट गॅलरीमध्ये एका प्रदर्शनादरम्यान कलाकार दिव्या मेहरा यांना ही मूर्ती दिसली आणि त्यांनी हा मुद्दा पुढे आणला. त्यानंतर केंद्र सरकारने ही मूर्ती पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सरकारच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर गुरूवारी ही मूर्ती भारतात दाखल झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, स्मृती इराणी मीनाक्षी लेखी, जी. किशन रेड्डी यांनी दिल्ली येथे या मूर्तीचे विधिवत पूजन केले.
 
 

ap_1  H x W: 0  
 
 
अन्नपूर्णेची ही मूर्ती उत्तर प्रदेश सरकारकडे सोपविण्यात आली असून मंत्री सुरेश राणा आणि निलकंठ तिवारी यांनी मूर्ती स्विकारली. येत्या १५ नोव्हेंबर रोजी काशी विश्वनाथ मंदिरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते मूर्तीची पुर्नप्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यापूर्वी ही मूर्ती उत्तर प्रदेशातील विविध स्थानांवर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, १९७६ पासून आतापर्यंत देवीदेवतांच्या ५५ मूर्त्या आणि अन्य वस्तू भारतात परत आणण्यास यश आले आहे. त्यापैकी तब्बल ४२ मूर्त्या २०१४ नंतर भारतात परत आणण्यात आल्या आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.