'नवाब मलिक यांनी आता चॅनेल समोर पोपटपंची करु नये'

10 Nov 2021 00:21:24

pravin darekar_1 &nb
मुंबई, दि. ९ नोव्हेंबर: "विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत मलिक यांच्यावर जे गंभीर आरोप केले त्यावर प्रत्युत्तर देताना नवाब मलिक आज हतबल झालेले दिसले. मलिक यांना बॉम्ब फुटल्याचे आवाज येणार नाहीत कारण मलिक यांनी आपल्या कानात बोळे घातले आहेत. मलिक यांना जे काही स्पष्टीकरण द्यायचे आहे ते त्यांना न्यायालयात वा तपासणी यंत्रणांसमोर द्यावे लागेल. त्यामुळे आता चॅनेलसमोर पोपटपंची करुन चालणार नाही", असा मार्मिक टोला विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांनी मारला.

जे प्रश्न देवेंद्रजींनी उपस्थित केले त्यातील एकाही प्रश्नाचे उत्तर मलिक यांनी दिले नाही. केवळ विषय गोलमाल फिरविण्याची धडपड मलिक यांच्याकडून झालेली दिसली असे स्पष्ट करतानाचे ते म्हणाले की, कवडीमोल भावाने जर जागा विकत घेतली नाही तर किती रुपयांनी जागा घेतली. याचे उत्तर त्यांनी दिले नाही. सरदार शाहवली खान व सलीम पटेल यांच्याशी असलेले संबंध व झालेला करार खोटा आहे हे त्यांनी सांगितले नाही. देवेंद्रजी यांच्या आरोपांना उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न मलिक यांनी केला असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्रजी याचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध तुम्हाला काल पर्यंत का दिसले नाहीत. जे प्रश्न देवेंद्रजी यांनी उपस्थित केले त्यावर मलिक यांनी कुठलेही भाष्य केले नाही. यंत्रणांकडे जाण्यापेक्षा माध्यमांच्या मार्फत गुमराह करण्याची सवय मलिक यांना लागली आहे. त्यामुळे आता लवकरच दूध का दूध व पानी का पानी होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0