पुणे लोहगाव विमानतळाची सेवा पुन्हा सुरु

01 Nov 2021 17:34:10

पुणे विमानतळ _1 &nbs
 


पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळ ऑक्टोबर महिन्यात शेवटचे २ आठवडे दुरुस्तीच्या कामामुळे बंद होते. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना लांबचा प्रवास करताना त्रास सहन करावा लागत होता. मात्र ३१ ऑक्टोबर पासून पुणे (लोहगाव) विमानतळाची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्यामुळे बाहेर गावी जायला अनेक पर्यटक पुणे विमानतळावर गर्दी करत आहेत. काल ३१ ऑक्टोबर आणि आज १ नोव्हेंबर रोजी पुणे विमानतळावर पर्यटकांच्या बाहेरगावी जाण्यासाठी लांब रांगा लागल्या होत्या. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता १५ दिवसांनी पहिल्यांदा लोहगाव विमानतळावरून पहिले उड्डाण झाले.
 
ऑक्टोबर महिन्यात २ आठवडे बंद असलेले विमातळ आणि दिवाळीच्या पार्शवभूमीवर विमानांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या ३० नोव्हेंबर पर्यंत लोहगाव विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ ह्या १२ तासाच्या कालावधीतच सुरु राहणार असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर होणारी गर्दी लक्षात घेता विमान उड्डाणाच्या वेळे पेक्षा २ तास आधी विमानतळावर पोहचावे अशी सूचना पुणे विमानतळाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.




Powered By Sangraha 9.0