वनवासी भगिनींनी तयार केलेल्या कंदिलांनी लखाखणार राजभवन

विवेक रुरल सेंटर संचालित वनवासी कारागीर भगिनींच्या हस्ते बनविलेल्या कंदिलांच्या ऑनलाईन खरेदीसाठीही पसंदी

    दिनांक  09-Oct-2021 15:52:14
|

Vivek Rural develpoment _
 
 
मुंबई : विवेक रुरल सेंटरच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात आलेल्या वनवासी महिला कारागिरांनी बांबूपासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक आकर्षक दिवाळी कंदिलांनी मुंबई, पुणे व नागपूर येथील राजभवन लखाखणार असून यासाठी राजभवनातून कंदिलांची मागणी करण्यात आली आहे.हे कंदील आता ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांसाठीच सहज उपलब्ध होणार आहेत. यासाठी http://www.sevavivek.com या संकेतस्थळाचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर करण्यात आला.
 
 
 
हा सोहळा मुंबई येथे राजभवनावर संपन्न झाला. यावेळी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरचे व्यवस्थापक लुकेश बंड, प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे,राहुल पारेख -संचालक सन फार्मा लिमिटेड, शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड- कार्याध्यक्ष व रायगड विकास प्राधिकरणचे सदस्य, पांडुरंग ताठेले, डॉ, रविराज अहिरराव- संचालक वास्तू रविराज, पूजा अहिरराव अकोलकर- संचालक- प्रिस्टीन मीडिया सोल्युशन ,राजकुमारी गुप्ता आदी उपस्थित होते.
 
 
 
'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणकरिता पालघर जिल्हातील वनवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने विवेक या संस्थेने पुढाकार घेत अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देत आहे. त्यांचाकडून पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या बहुउपयोगी निरनिराळ्या वस्तू तयार करतात. यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करत आहेत.
 
याचाच एक भाग या संस्थमार्फत स्वदेशी आकाशकंदीलची निर्मिती करण्यात येते. हे आकाशकंदील पूर्णतः स्वदेशी व पर्यावरण पूरक बांबूनिर्मित आहेत. यात पाच प्रकारचे आकाशकंदील बनविण्यात आले आहे. यात बुध, गुरु आकाशकंदील, शुक्र आकाशकंदील, सप्तर्षी आकाशकंदील, ध्रुव आकाशकंदील याचा समावेश आहे. विविध रंगांमध्ये बनविण्यात आले आहेत. आता या कंदिलांसह इतर बांबू वस्तू सर्वांना ऑनलाइन खरेदी करता येणार असून त्यासाठीच्या संकेतस्थळाचा शुभारंभ आज राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला.
 
 
Vivek Rural develpoment _
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.