ज्येष्ठ स्वयंसेवक धनंजय आकरे यांचे निधन

ज्येष्ठ स्वयंसेवक धनंजय आकरे यांचे निधन

    दिनांक  08-Oct-2021 13:17:39
|

rss  _1  H x W:

पालघर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक धनंजय आकरे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. पालघर जिल्ह्यातील सफाळे भागातील संघवाढीसाठी त्यांनी परिश्रम घेतले होते. आकरे हे हसतमुख चेहरा असलेले व्यक्तिमत्व होते. बालपणापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करण्यास सुरुवात केली.

अखेरपर्यंत ते संघ स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. अनेक सामाजिक कार्यात सहभागी होऊन ते यशस्वी करण्यासाठी ते मेहनत घ्यायचे. काव्यलेखनाबरोबरच त्यांना इतिहासाविषयीचे लेखन करण्याचीही विशेष आवड होती. माझे गाव, माझी शाळा, माझा समाज, माझा देश ही दृढ भावना रुढ झाली असल्याने त्यांनी संघकार्याला वाहून घेतले होते.


मागील महिन्यात दि. 25 सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. हे त्यांचे अखेरचे आंदोलन ठरले. आकरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.