२०२५ पर्यंत चीन बळकावणार तैवान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2021
Total Views |

TAIWAN_1  H x W

तैपेई :
चीनच्या दक्षिणेकडील ऐक छोटे राष्ट्र आहे तैवान. या तैवान राष्ट्राला चीन आपल्याच साम्राज्यातील एक भाग मानते. परंतु तैवान स्वतःला वेगळे राष्ट्र मानते, त्यांचे स्वतःचे एक राष्ट्रध्वज आहे,राष्ट्रगीत आहे. तैवानने स्वातंत्र्याची घोषणा केल्यापासून चीनने वारंवार तैवानवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न केला आहे. मागील काही दिवसात चीनच्या वाढत्या विस्तारवाद्या भूमिकेला विरोध करण्यासाठी अनेक देश चीनच्या या दुखत्या कळेवर बोट ठेवत आहे.ऑकसमध्ये तैवानबद्दल उल्लेख केलेला आहे. त्यामुळे भडकलेल्या चीनने गेल्या काही दिवसात १५२ युद्ध विमाने तैवानच्या हवाई हद्दीतून घुसविले आहेत. तैवानच्या 'राष्ट्र' दिवसावेळीही चीनने तैवानमध्ये हवाई घुसखोरी केलेली आहे.

चीनच्या या वाढत्या कारवायांमुळे चिंताग्रस्त झालेल्या तैवानच्या सुरक्षा मंत्री 'चिउ कुओ-चेंग' यांनी २०२५ पर्यंत चीन आणि तैवान मधील एका मोठ्या युद्धासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. तैवानचे 'त्साई इंग-वेन' राष्ट्रध्यक्षांनी जगाला उपदेशून असे सांगितले की जर चीनसमोर आमचा पराभव झाला तर हा अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा पराभव असेल. तसेच त्यांनतर जगाला मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टर चिपचासुद्धा अभाव जाणवेल.







@@AUTHORINFO_V1@@