गायिका योगिता बोराटे यांचे नवरात्रीनिमित्त खास गाणे प्रदर्शित

07 Oct 2021 12:11:23

Yogita Borate_1 &nbs
 
 
 
मुंबई : प्रसिद्ध गायिका 'योगिता बोराटे' यांनी नवरात्रीचे औचित्य साधत 'घोर अंधारी रे' हे खास गुजराती गाणे प्रदर्शित केले. या गाण्यात पारंपारिक गरबा सादर केला आहे. तसेच योगिता बोराटे यांनी हे गाणं गायले असून 'योगेश रायरिकर' यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तसेच, प्रिती संपत यांच्या नृत्यम डान्स अकॅडमीतील दोघांनी नृत्याविष्कार सादर केला आहे.
 
 
 
 
गायिका योगिता बोराटे या गेली २५ वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' संस्थापिका आहेत. तर त्यांची 'स्वरमेघा म्युझिक' अकॅडमी देखिल आहे. 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' अंतर्गत त्यांनी याआधी ६ संगीत कार्यक्रम केलेले आहेत. तर याआधी त्यांची 'दिल लगी ये तेरी' आणि 'हम हात जोडे दोनो' ही ओरिजनल हिंदी गाणी प्रसिद्ध आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेर त्यांनी अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत. युगांडा तसेच लंडनमध्ये त्यांनी २ ते ३ महिने संगीत कार्यक्रम केलेले आहेत.
 
 
गायिका योगिता बोराटे 'घोर अंधारी रे' या गुजराती गाण्याविषयी म्हणतात, ''मी मुळची बडोद्याची असल्यामुळे मी नवरात्री हा सण फार जवळून पाहिला आहे. तेथील गरबा प्रेक्षणीय आणि श्रवणीय असतो. जितकी गर्दी गरबा खेळण्यासाठी असते तितकीच गर्दी ती गरब्यातील गाणी ऐकण्यासाठी असते. आणि आजही बडोद्यात अजूनही असाच गरबा अनुभवायला मिळतो. माझा संगितकार मित्र योगेश रायरिकर तोही बडोद्याचाच आहे. तर आम्ही दोघांनी मिळून हे गाणं करायचं ठरवलं.''
 
 
पुढे योगिता, या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानचा किस्सा सांगतात, ''अवघ्या १० दिवसांत बनवलेलं हे माझं पहिलचं गाणं आहे. खरंतर कोणत्याही गाण्याच्या प्रोसेसिंगला फार वेळ लागतो. रेकॉर्डींग पासून ते चित्रीकरणापर्यंत ब-याच गोष्टी असतात. संपूर्ण गाण्याचं प्रोसेसिंग सुरू असताना अनेक अडचणी आल्या, हातात वेळही कमी होता. परंतु अंबामातेच्या कृपेमुळे हे गाणं पूर्ण होऊ शकले. या गाण्याची प्रोग्रामींग आणि मिक्सींग सुरतला झाली, या गाण्याचं लाईव्ह रिदम बडोद्याला झालं, तर ऑडीओ मुंबईतील आजीवासन स्टुडिओत झाला. एक गाणं इतक्या ठिकाणी ट्रॅव्हल करत ते आज देवी मातेच्या आशीर्वादाने प्रदर्शित झालं. या गाण्यात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली. त्या सर्वांचे मी ऋणी आहे."
 
 
 
Powered By Sangraha 9.0