जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव रामगंगा राष्ट्रीय उद्यान?

07 Oct 2021 14:57:47

JIMCORBET_1  H
देहरादून : केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी भारतातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलण्याचे संकेत दिले आहेत ,जे सुमारे ५२१ किमी परिसरात पसरलेले आहे. पार्कच्या दौऱ्यावर त्यांनी नुकताच संग्रहालयाच्या त्यांच्या अतिथी पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे की जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून रामगंगा राष्ट्रीय उद्यान करावे.जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचे संचालक राहुल यांनीया वाक्याची पुष्टी केली आहे परंतु अधिक टिप्पणी करण्यास नकार दिला.
वन्यप्रेमींकडून असंतोष
मात्र, संभाव्य नाव बदलाबद्दल वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. वन्यजीव प्रेमी प्रकाश किमोथी म्हणाले, नाव बदलण्यापेक्षा आपण आपला वारसा जपण्यावर जास्त भर दिला पाहिजे.जिम कॉर्बेट पार्कचे नाव याआधीही अनेक वेळा बदलले गेले आहे.१९३६ मध्ये स्थापनेच्या वेळी 'हेली नॅशनल पार्क' असे नाव असलेल्या या उद्यानाचे नाव दोन दशकांनंतर शिकारीपासून संवर्धनवादी असा प्रवास घडलेल्या 'जिम कॉर्बेट' यांच्या नावावर ठेवण्यात आले. तथापि, मधल्या काही काळासाठी, रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे नाव पडले कारण रामगंगा, गंगेची उपनदी, येथून वाहत असते.



Powered By Sangraha 9.0