व्हॉट्सअप, फेसबूकनंतर आता जिओ नेटवर्क डाऊन!

    दिनांक  06-Oct-2021 12:30:09
|

JIO _1  H x W:


नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर कंपनी असलेल्या रिलायन्स जिओच्या ग्राहकांना मोठा फटका बसला. सोशल मीडियावर #jiodown हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. ग्राहकांनी जिओचे नेटवर्क डाऊन असल्याची तक्रार केली आहे. अनेक तासांपासून जिओचे नेटवर्क काम करत नसल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सोमवारी व्हॉट्सअप, फेसबूक आणि इन्स्टाग्रामनंतर आता जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याचा फटका नेटीझन्सना बसला. 


जिओ कनेक्शनच्या तक्रारींचे एकूण ४ हजार रिपोर्ट आले आहेत. ते सातत्याने वाढताना दिसत आहेत. डाऊनडेक्टरवरील डेटा पाहता, बुधवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या तक्रारींचा पाऊस पडू लागला. तासाभरात या तक्रारींचे प्रमाण आणखी वाढू लागले.


याबद्दल जिओतर्फे कुठलीही अधिकृत प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. मात्र, काही भागांतील जिओ सेवा प्रभावित झाल्याची माहिती आहे. काही भागांत ग्राहकांना नेटवर्क मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. कंपनीची टेक्निकल टीम या प्रकाराबद्दल तपासणी करत आहेत. जियोच्या मोबाईल ग्राहकांची संख्या जुलैमध्ये ६१ लाखांनी वाढली होती. जुलैच्या रिपोर्टनुसार, एकूण ३४.६४ कोटी जिओचे ग्राहक सध्या आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.