'रामायणा'तील रावण साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन

06 Oct 2021 17:18:57

Arvind trivedi_1 &nb
 
 
 
मुंबई : दूरदर्शनवर येणारी ऐतिहासिक 'रामायण' मालिकेमध्ये 'रावण' हे पात्र साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे ५ ऑक्टोंबरला मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ८३ वर्षांचे अरविंद त्रिवेदी हे मुळचे ईडरच्या कुकडिया गावचे रहिवाशी होते. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बऱ्याच दिवसांपासून छोट्या मोठ्या आजारांनी त्रस्त होते.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "अरविंद त्रिवेदी हे उत्तम कलाकार तर होतेच, याशिवाय ते समाजाबद्दल आत्मीयता असलेले व्यक्तिमत्त्व होते. भारतीयांच्या पिढ्यानपिढ्या त्यांना रामायणातील रावणाच्या भूमिकेसाठी स्मरणात ठेवतील."
 
 
 
 
 
दूरदर्शनवर प्रसारित होणारे रामानंद सागर यांची अत्यंत लोकप्रिय मालिका 'रामायण' मध्ये त्रिवेदी यांनी रावणाचे पात्र साकारले होते. त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका अशा प्रकारे बजावली की, आजही त्यांची तीच प्रतिमा लोकांच्या डोळ्यांसमोर आहे. त्रिवेदी यांची अभिनयाची सुरुवातीची कारकीर्द गुजराती नाट्यभूमीपासून सुरू झाली. त्यांनी आपल्या अभिनयातून आणि लोकप्रिय हिंदी धारावाहिक रामायणमधून नाव कमावले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी सुमारे ३०० हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0