जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 'भाजप'च सर्वात मोठा पक्ष!

06 Oct 2021 16:17:18
bjp_1  H x W: 0




मुंबई -
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये भारतीय जनता पार्टीच सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला जिल्हा परिषदेमध्ये २३, तर पंचायत समितीमध्ये ३३ जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास त्यांचा धुव्वा उडाला आहे.
 
 
 
बुधवारी राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीची मतमोजणी पार पडली. जिल्हा परिषदेच्या ८५ आणि पंचायत समितीची १४४ जागांवर निवडणूक लढवण्यात आली. या मतमोजणीमध्ये भाजपने विजयाचा झेंडा फडकावला आहे. कारण, या निवडणुकांमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीला एकत्रितपणे भाजपपेक्षा जास्त मिळाल्या असल्या तरी, स्वतंत्रपणे पाहिल्यास भारतीय जनता पक्षच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
 
 
 
जिल्हा परिषदेमध्ये भाजपला २३, राष्ट्रवादी काॅंग्रेस १७, काॅंग्रेस १७ आणि शिवसेनेला १२ जागेवर विजय मिळवता आला आहे. पंचायत समितीमध्ये भाजप ३३, शिवसेना २२, राष्ट्रवादी १६, काॅंग्रेसला ३५ आणि इतरांना ३८ जागांवर विजय मिळवता आहे. त्यामुळे या आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपच मोठा पक्ष असल्याचे लक्षात येते.
Powered By Sangraha 9.0