संघाविरोधातील वक्तव्य भोवणार! अख्तरविरोधात गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2021
Total Views |
Javedh Akhtar _1 &nb



मुंलुंड पोलीस ठाण्यात एफआयआर


मुंबई : रा.स्व.संघाची तुलना तालीबान्यांशी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर विरोधात मुलुंड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका वकिलामार्फत ही तक्रार नोंदविण्यात आली होती. मुलुंड पोलिसांनी गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही एफआयआर दाखल केली आहे.


मुंबईतील वकील संतोष दुबे यांनी ही एफआयआर दाखल केली आहे. जावेद अख्तरने गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत हे वक्तव्य केले होते. संघाबद्दल वक्तव्य करताना जावेद अख्तर यांची जीभ घसरली होती. तालीबानशी तुलना गेल्याच्या आरोपांवरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुबे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जावेद अख्तर यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी वकिलांनी केली होती. मात्र, तसे न केल्याने ही कारवाई केली जात आहे.


यापूर्वी दुबे यांनी शंभर कोटींचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला होता. अख्तर यांनी सात दिवसांत माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात ही कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड संहिता कलम ४९९ (मानहानि) आणि ५०० (मानहानीची शिक्षा) या अंतर्गत गुन्हा असल्याने ही तक्रार दाखल केल्याचे दुबे यांनी म्हटले आहे.



अख्तर नेमकं काय म्हणाले ?

जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. ज्यात त्यांनी रा.स्व.संघाविरोधात गरळ ओकली होती. संघाच्या पुरस्कर्त्यांची मानसिकताही तालीबान्यांसारखी असते. त्यांनी आत्मपरिक्षण करायला हवे. त्यांच्यात आणि तालीबान्यांमध्ये काय अंतर आहे, असे ते म्हणले होते. देशभरातून अख्तर यांच्या या मानसिकतेचा विरोध करण्यात आला. वादग्रस्त विधान करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वीही अख्तर यांनी हिंदूविरोधी विधाने केली आहेत.



@@AUTHORINFO_V1@@