कसा सापडला शाहरुखचा मुलगा NCBच्या ताब्यात? काय घडलं त्या रात्री!

03 Oct 2021 12:11:45

Aryan Khan _1  



मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) शनिवारी २ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईत एका क्रुझ शिपवर छापेमारी केली. या क्रूझवर रेव्हपार्टी सुरू होती. यात तीन महिलांसह एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक झालेल्यांपैकी एक जण बॉलीवुड सुपरस्टार किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही आहे. एनसीबीने त्यालाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आहे. 


आर्यन खान पार्टीत होता. चौकशीत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थ आढळलेले नाहीत. मात्र, घटनास्थळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी एका बॉलीवुड अॅक्टरचा मुलगाही सापडला आहे, अशीही माहिती आहे. मात्र, याबद्दल अद्याप स्पष्टता एनसीबीने केलेली नाही. 



Cruze_1  H x W:

 
दरम्यान, शाहरुख खानच्या मुलाची एनसीबी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनचा फोन तपासण्यात आला. या ड्रग्ज रॅकेट आणि क्रुझ पार्टीशी त्याचा थेट संबंध आहे का, याबद्दलही चौकशी केली जाणार आहे. आर्यनने ड्रग्ज खरेदी केले होते का, त्याबद्दल अधिकाऱ्यांनी स्पष्टता केलेली नाही. 






मुंबई ते गोवा जाणाऱ्या एका जहाजात रेव्ह पार्टी सुरू होती. दिल्लीतील तरुण या पार्टीत सहभागी झाले होते. गांधी जयंतीनिमित्त मुंबईत कडेकोट बंदोबस्त असल्याने पार्टी ही क्रूझवर करण्यात आली. पोलीसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ही पार्टी क्रूझवर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पार्टीत सहभागी होण्यासाठी तरुणांनी दिल्लीतून विमानाने मुंबई गाठली. तिथून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. 




पार्टीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी ८० हजार ते पाच लाखांपर्यंत प्रवेश फी घेतल्याचेही बोलले जात आहे. या कारवाईत एनसीबीला तीन प्रकारचे ड्रग्ज मिळाले आहेत. पार्टीमध्ये आम्हाला पाहूणे म्हणून बोलविण्यात आल्याचा दावा शाहरूखचा मुलगा आर्यन आणि त्याच्या सोबत असणाऱ्या आणखी एका सुपरस्टारच्या मुलाने केला आहे. आर्यनचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. एनसीबी आता त्याचीही पुढे चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे. 



सहाशे हायप्रोफाईल लोग करत होते पार्टी! 
प्रार्थमिक माहितीनुसार, जहाजावर छापेमारी झाली त्यावेळी एकूण सहाशे हायप्रोफाईल लोग उपस्थित होते. मुंबईहून निघालेल्या या बोटीवर सर्वजण पार्टीसाठी आले होते. त्यासाठी त्यांच्याकडून ८० हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत एण्ट्री फी घेण्यात आली होती. 


तीन महिलांची होणार चौकशी 
एनसीबीने केलेल्या छापेमारीतील तीनही महिला दिल्लीतील आहेत. सुत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, त्या दिल्लीतील आहेत. त्यांना मुंबईतील एनसीबी कार्यालयात आणले असून त्यांचीही चौकशी सुरू आहे. 




Powered By Sangraha 9.0