बांग्लादेशातील हिंदूंवरील इस्लामी हल्ल्याचा रा. स्व. संघाकडून निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2021
Total Views |
rss_1  H x W: 0

कथित मानवाधिकार संघटनांच्या मौनावरही टिका केली आहे
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : बांग्लादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर होत असलेल्या इस्लामी हल्ल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निषेध करण्यात आला आहे. तेथे होत असलेल्या मानवाधिकारांच्या हननाचा मुद्दा बांग्लादेश सरकारपुढे मांडावा, असे आवाहनदेखील केंद्र सरकारकडे करण्यात आले आहे.
 
 
रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक कर्नाटकमधील धारवाड येथे पार पडली. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बांग्लादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करणारा ठराव मंजुर करण्यात आला आहे.
 
 
 
बांग्लादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर आणि मंदिरांवर हिंसक हल्ल्यांचे सत्र अनेक दिवसांपासून सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये हिंदू समाजातील माता – भगिनींवर अत्याचार झाले, दुर्गापुजेदरम्यान निरपराध हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या तसेच शेकडो हिंदू बेघर झाले आहेत. हिंदू समाजाविरोधात अफवा पसरविणे आणि त्यानंतर कट्टरतावादी इस्लामी गटांनी त्यांना लक्ष्य करणे हे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले असून बांग्लादेशातील हिंदू समाजाचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचे स्पष्ट होत आहे. बांग्लादेशात सातत्याने घटत असलेली हिंदूंची लोकसंख्या हे त्याचे उदाहरण असल्याचे ठरावात म्हटले आहे.
 
 
बांग्लादेश सरकारने अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले रोखण्याची गरज असल्याचे ठरावामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारने उपलब्ध राजनैतिक मार्गांचा वापर करून बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार जगासमोर मांडावे, असेही आव्हान ठरावात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या तथाकथित संघटना, संयुक्त राष्ट्राशी संबंधित संघटनांनी या प्रकारावर बाळगलेल्या मौनावरदेखील ठरावामध्ये टिका करण्यात आली आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@