आर्यन खानला जामीन मंजूर! तरीही आजची रात्र तुरुंगातच

28 Oct 2021 16:54:11

Aryan Khan _1  




मुंबई :
ड्रग्ज पार्टी प्रकरणात तब्बल २६ दिवस ताब्यात असणाऱ्या आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयातर्फे जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरबाज खान, मुनमुन आणि असलम मर्चट यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी तिघांनाही जामीन मंजूर झाल्याची माहिती मुकुल रोहतगी यांनी प्रसार माध्यमांना दिली. याबद्दलची सविस्तर कोर्ट ऑर्डर शुक्रवारी दिली जाईल. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवार किंवा शनिवारी आर्यन तुरुंगातून बाहेर पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0