साजरा करत होते पाकिस्तानचा विजय, फायरींगमध्ये १२ जणांना गोळ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |
karachi _1  H x



कराची - 
टी -20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या विजयाच्या जल्लोषात पाकिस्तानी लोकांनी गोंधळ घातला. इस्लामाबाद, कराची, रावळपिंडी आणि क्वेटा या मोठ्या शहरांमध्ये रविवारी रात्री हजारो लोक रस्त्यावर उतरले. या दरम्यान मोठ्या संख्येने लोकांनी हवेत गोळीबार करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी कराचीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हवाई गोळीबारात १२ लोकांना गोळ्या लागल्याच्या बातम्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळ्या झाडण्यात आलेल्यांमध्ये एका उपनिरीक्षकाचाही समावेश आहे.
 


कराची पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री उत्सवादरम्यान शहरातील विविध भागात गोळीबार करण्यात आला. यादरम्यान अज्ञात लोकांच्या गोळीबारात उपनिरीक्षकासह १२ जण जखमी झाले. कराचीतील ओरंगी टाऊन सेक्टर-४ आणि 4के चौरंगी येथे झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, गुलशन-ए-इक्बाल येथे हवाई गोळीबार करणाऱ्यांविरोधातील कारवाईदरम्यान एका उपनिरीक्षकाला गोळ्या लागल्या. या दोन घटनांव्यतिरिक्त, कराचीतील सचल गोथ, ओरंगी टाउन, न्यू कराची, गुलशन-ए-इक्बाल आणि मलीरसह विविध भागात हवाई गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.
 
 

पाकिस्तान या विजयाला धार्मिक रंग देत आहे. पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी भारताविरुद्धच्या या विजयाला संपूर्ण इस्लामचा विजय असल्याचे म्हटले आणि जगभरातील मुस्लिमांना फतह मुबारक म्हटले. रशीद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी संघाला भारतातील मुस्लिमांसह जगातील सर्व मुस्लिमांचा भावनिक पाठिंबा होता. हा मुस्लिम जगाचा विजय आहे. पाकिस्तान जिंदाबाद. इस्लाम जिंदाबाद." ऑगस्ट, २०२० मध्ये एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेख रशीद यांनी दावा केला होता की, भारतीय लष्कर हे पारंपरिक युद्धात पाकिस्तानी लष्करापेक्षा खूप वरचढ आहेत. म्हणून, पाकिस्तान ‘लघु आण्विक शस्त्रास्त्रांवर’ काम करत होता. ते म्हणाले की त्यांचे बॉम्ब इतके अचूक होते की, ते निवडकपणे केवळ भारतातील हिंदूंना लक्ष्य करतील.
@@AUTHORINFO_V1@@