क्रांती रेडकरनं मलिकांना झापलं? : मी हिंदूच कधी धर्म बदलला नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |

Wankhede _1  H




मुंबई :
समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत, असे म्हणत त्यांच्या पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा फोटो ट्विट केला आहे. चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे वापरुन नोकरी मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे. वानखेडेंनी हे आरोप फेटाळल्यानंतर आता त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर-वानखेडेही मैदानात उतरल्या आहेत. पती समीर वानखेडे यांच्या सोबतचे फोटो ट्विट करत अप्रत्यक्षपणे मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांना झापले आहे.
 
 
दोघांनी एकमेकांना वरमाला घालताना नंतर कुटूंबियांच्या साक्षीने मंदीरात विवाह करतानाचे दोन फोटो क्रांती यांनी पोस्ट केले. त्या म्हणाल्या, "मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही धर्मांतरण केलेले नाही. आम्हाला सर्व धर्मांचा सन्मान आहे. समीरचे वडीलही हिंदू असून त्यांनी मुस्लीम महिलेशी लग्न केले होते. माझ्या सासुबाई आज हयात नाहीत. समीर यांचे लग्न विशेष विवाह कायद्याअंतर्गत झाले. त्याने २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. आम्ही हिंदू विवाह कायद्यानुसार २०१७ साली लग्न केले आहे.”
 
कुणाशी झालं होतं वानखेडेंचं पहिलं लग्न?



नवाब मलिक यांनी पहिल्या लग्नाचे फोटो ट्विट केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चा केली जात आहे. विशेष विवाह कायद्याअंतर्गत समीर आणि शबाना यांचा विवाह झाला. २०१७ मध्ये त्यांनी क्रांतीशी विवाह केला, असेही ते म्हणाले. त्यापूर्वी शबानाशी त्यांनी दिवाणी न्यायालयाद्वारे घटस्फोट घेतला होता.




@@AUTHORINFO_V1@@