देश इस्लाम असूनही 'सुकर्णोपुत्रीं'नी का स्वीकारला हिंदू धर्म?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |

SUKARNO 2_1  H


जकार्ता, इंडोनेशिया : इंडोनेशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष माजी राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांची कन्या सुकमावती सुकर्णोपुत्री २६ ऑक्टोबर रोजी हिंदू धर्मप्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असणारा देश आहे. अशावेळी त्यांच्या या निर्णयामुळे जगभरातून लक्ष वेधले जात आहे.



सुकमावती सुकर्णोपुत्री या सुकरनो सेंटर हेरीटेज, बाली येथे होणाऱ्या कार्यक्रमात हिंदू धर्म स्वीकारतील. ७० व्र्षीय 'सुकमावती सुकर्णोपुत्री' ही 'सुकर्णो' यांची तिसरी मुलगी आणि माजी राष्ट्रपती मेगावती सुकर्णोपुत्री यांची धाकटी बहीण आहे. इंडोनेशियन नॅशनल पार्टीच्या (पार्टाई नॅशनल इंडोनेशिया-पीएनआय) त्या संस्थापक आहेत. त्यांचा विवाह कांजेंग गुस्ती पंगेरन आदिपती आर्य मांगकुनेगारा ९वा याच्याशी झाले होते, मात्र, १९८४मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.





SUKARNO_1  H x



का करतायत 'सुकमावती सुकर्णोपुत्री' हिंदू धर्मात प्रवेश?



२०१८मध्ये, कट्टर इस्लामिक गटांनी सुकमावती सुकर्णोपुत्री यांच्या विरोधात ईस्लामचा अवमान करणारी कविता सादर केल्याचा आरोप करून तक्रार दाखल केली होती. त्यावेळेस माझा उद्देश हा इस्लाम धर्माचा अपमान करणारा नव्हता, असे म्हणून माफीही मागितली होती, परंतु कट्टरतावाद्यांनी त्यांना आजपर्यंत त्रास देणे थांबविलेले नाही. या कवितेत त्यांनी आपल्या देशातील नागरिकांना इंडोनेशियाच्या प्रथा आणि परंपरांना तुम्ही पाळा, मुस्लिम प्रथा आणि परंपरा या बाहेरून आल्या आहेत, आपण आपल्या हजारो वर्ष जुन्या परंपरा संवर्धित करून ठेवायला हव्यात, त्यासाठी त्याचे अधिकाधिक पालन करायला हवे, असे आव्हान केले होते. यावरून इंडोनेशियातील कट्टर इस्लामिक गटांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. तिच्याविरुद्ध ईशनिंदेची तक्रारसुद्धा दाखल केली गेली होती.




सुकमावती सुकर्णोपुत्री यांनी या सर्व चर्चांचे खंडण केले आहे. त्या म्हणाल्या. "त्यांच्या आजी या बाली येथील रहिवासी होत्या. त्यांचा हिंदू धर्माविषयी गाढा अभ्यास होता. त्यांच्या आज्जीचे नाव 'इडा आयु न्योमन राय श्रीम्बेन', असे होते. त्यांच्यामुळे मी हिंदू धर्म स्वीकारला, असेही त्या म्हणाल्या.त्यांच्या या निर्णयाला तिचे भाऊ 'गुंटूर सोयकर्नोपुत्र', आणि गुरु 'सोकरनोपुत्र' आणि बहीण 'मेगावती सोकर्णोपत्री' यांचा पाठिंबा आहे. तसेच त्यांच्या मुलांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'सुकमावती सुकर्णोपुत्री' यांना हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी हिंदू धर्माच्या अनेक प्रमुख ग्रंथांना अभ्यासले आहे. हिंदू धर्मातील अनेक कथा त्यांना विशेष आवडतात. त्याचमुळे त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांच्या वकीलांनी सांगितले.






किती आहे इंडोनेशियामध्ये हिंदूंची लोकसंख्या?



२०१८च्या जनगणनेनुसार, इंडोनेशियातील हिंदू धर्म एकूण लोकसंख्येच्या १.७४ टक्के आहे आणि बालीतील सुमारे ८७ टक्के लोकसंख्या हिंदू आहे. हिंदू धर्म हा इंडोनेशियातील सहा अधिकृत धर्मांपैकी एक मानला जातो. भारत, नेपाळ आणि बांगलादेशनंतर इंडोनेशियात जगातील चौथ्या क्रमांकाची हिंदू लोकसंख्या आहे.



इंडोनेशिया आणि हिंदू धर्माचा आहे प्राचीन संबंध



एकेकाळी, इंडोनेशिया आणि त्याच्या आजूबाजूच्या राष्ट्रांवर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव होता. हिंदू धर्म हा इ.स.च्या पहिल्या शतकाच्या सुरुवातीला जावा आणि सुमात्रा बेटांवर पसरले होते आणि १५ व्या शतकापर्यंत समृद्ध झाले होते. तसेच इस्लामच्या आगमनानंतर हिंदू धर्म कमी झाला आणि लवकरच मुस्लिमबहुल असलेल्या देशात हिंदू अल्पसंख्याक बनले. आजही इंडोनेशियात रामायणाशी संदर्भित शिल्पे आढळतात, तसेच येथे आजही हिंदू देवी देवतांशी संबंधित नावे मुलांना दिली जातात.





शाप होईल खरा? हिंदू धर्म पुन्हा बहुसंख्य होईल इंडोनेशियात!



हिंदू पुजारी सबदापालोनची भविष्यवाणी : सबदापलोन हे इंडोनेशियातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य असलेल्या मजपाहित साम्राज्याच्या राजा ब्राविजय पंचमच्या दरबारात एक पुजारी होते. जेव्हा राज्य इस्लामिक प्रभावाखाली आले आणि १४७८ मध्ये ब्राविजया पाचवाने इस्लाम स्वीकारला तेव्हा सबदापालोनने राजाला शाप दिला तसेच त्यांनी भविष्यवाणी केली 'मी ५०० वर्षांनंतर ज्यावेळेस या राज्यात नैसर्गिक आपती आणि राजकीय भ्रष्टाचार वाढेल त्यावेळेस जन्म घेईन ',द्वीपसमूह इस्लामच्या तावडीतून मुक्त करण्याचा आणि हिंदू धर्माला पुनर्संचयित करण्याचा निश्चयही व्यक्त केला होता. त्यांच्या या भविष्यवाणीवर इंडोनेशियातील अनेक हिंदूंच विश्वास आहे.






@@AUTHORINFO_V1@@