चार महिन्यांच्या पाठयपुस्तकाची योजना देशभरात राबविण्यासाठी शिफारस करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |

विनय सहस्त्रबुद्धे _1&nbs
 
 
 

पुणे : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ''बालभारतीच्या'' चार महिन्यांच्या पाठयपुस्तकाची योजना देशभरात राबवावी यासाठी आपण केंद्र सरकारला शिफारस करणार आहोत अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे राज्यसभेतील खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी पत्रकारांशी सवांद साधताना ही माहिती त्यांनी दिली. या संवादावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन.काळमळकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे हे देखील उपस्थित होते.

या संवादावेळी '' भारताच्या शिक्षण प्रणालीवर अजूनही ब्रिटिशकालीन प्रभाव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ''वारली चित्रकलांसारख्या'' अनेक कलांना अजूनही मुख्य शिक्षण प्रवाहात गणले जात नाहीये अशीही खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. राष्ट्रीय अभ्यासक्रमाविषयी विचारले असता '' राष्ट्रीय अभयसक्रम निशचित होण्या आगोदर राज्यांनी त्यांची -त्यांची अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. तसेच आता देशातील सर्वच स्तरांमधून ''नवीन शैक्षणिक धोरणाच्या'' अंमलबजावणीसाठी सकारात्मक वातावरण तयार झाल्याचेही विनायक सहस्त्रबुद्धे म्हणाले.

पुणे विद्यापीठात पत्रकारांशी संवाद साधताना ''भारताच्या लोकशाहीचा अभ्यास करण्यासाठी ७५ देशांचे ३५ वर्ष वयोगटातील आतील प्रतिनिधी येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. '' भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवा निमित्त जगातील ७५ देशांचे लोकप्रतिनिधी भारताच्या लोकशाहीचा अभ्यास करण्यासाठी येणार आहेत. '' जेन नेक्स्ट डेमोक्रसी नेटवर्क'' नावाच्या या कार्यक्रमातील पहिल्या २५ जणांचा चमू २५ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतात येणार आहे .

विशेष म्हणजे ह्या सर्व लोकप्रतिनिधींचे वय हे ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. '' ग्रामपंचायतीपासून ते थेट देशाच्या संसदेपर्यंतचा'' देशातील समृद्ध लोकशाहीचा वारसा हे लोकप्रतिनिधी समजून घेतील अशी सविस्तर माहिती त्यांनी या वेळेज दिली.

 
@@AUTHORINFO_V1@@