पुण्यानं लसीकरणात ओलांडला ५० लाखांचा टप्पा; पालिकेनं मोजले तब्बल १४१ कोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |

पुणे लसीकरण _1  
 
 
 
 

पुणे : पुणे शहरात ५० लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ६५ टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली ; तर 35 टक्के लोकांनी पैसे भरून लस घेतली. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती नियंत्रणात आली आहे. व्यापक प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम राबविल्याने देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. एकट्या पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत .
 
यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली ; तर 35 टक्के लोकांनी पैसे देऊन लस घेतली आहे. यासाठी लसीकरण मोहिमेसाठी पुणे महानगरपालिकेने तब्बल 141 कोटी 26 लाख 53 हजार 15 रुपयांचा निधी खर्च केला असल्याची माहिती महापालिकेकडून प्राप्त झाली आहे. 16 जानेवारी 2021 पासून केंद्रसरकारने देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात केली होती; लस कोणाला द्यायची याबाबत सुरुवातीच्या काळात अनेक बंधन होती. कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड ओढाताण करावी लागली असे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी दिल्यानंतर पैसे भरून लस घेण्याचे प्रमाण वाढले.
 
''देशात गेल्या काही महिन्यांपासून व्यापक स्तरावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. शनिवारी शहरात 22 हजार 399 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यामुळे सध्या पुण्यात लसीकरणाचा आकडा 50 लाख 20 हजार 78 वर पोहोचला आहे. शहरात आणखी 12 लाख डोसचं लसीकरण होणं अपेक्षित असून, यामध्ये दुसऱ्या डोसवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@