नवले पुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत बोलावणार विशेष बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |

मुरलीधर मोहोळ _1 &nb
 
 
 
 



पुणे : मुंबई- पुणे- सातारा अश्या तीन महत्वाच्या शहरांना जोडणारा आणि पुणे महानगरपालीकेच्या हद्दीतून जाणाऱ्या ''नवले पुलावर'' गेल्या आठवड्यात ८ अपघात होऊन १५ जणांचा जीव गेला आहे. या प्रश्नावरून पुणे महानगरपालिकेच्या मुख्यसभेत गदारोळ पाहायला मिळाला.

पुणे महानगरपालिकेत उपस्थित नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि वाहतुक पोलीस यांच्या दुर्लक्षित कारभारावर टीका केली. तसेच कात्रज-देहू रस्त्याची रखडलेली कामे पूर्ण करा अशी मागणी केली. त्यामुळे या जटील प्रश्नावर पुणे महापालिकेत बैठक बोलविण्याचे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी प्रशासनाला दिले.

पुणे महानगरपालिकेची मुख्य सभा सुरु झाल्यावर अनेक उपस्थित संतप्त नगरसेवकांनी नवले पुलावर गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातांचा मुद्दा उपस्थित केला. या महामार्गावर आत्ता पर्यंत गेल्या वर्षभरात ७० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी कुठलाही अपघात झाल्यास एनएचएआय आणि पुणे महानगरपालिकेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवण्यातच धन्यता मानत आले आहेत. पुण्याच्या चांदणी चौकात अपघात रोखण्यासाठी जश्या उपाययोजना झाल्या तश्याच उपाययोजना नवले पुलावर पण करायला पाहिजेत अशा मागण्यांनी सध्या जोर पकडला आहे. गेल्या वर्षी नवले पुलावरील होणाऱ्या गंभीर अपघातांची दखल बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि देशाचे महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पण संसदेत घेतली होती.

नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्याने कात्रज- देहू रस्त्यावरील राहिलेली कामे नीट पार पडली. पण नवले पुलावरील ''सेल्फी पॉईंट'' आणि सातारा शहराकडे जाणारी वेगवान वाहने यांच्यामुळे गेल्या आठवड्यात अनेक अपघात झाले आहेत असे निरीक्षणास येत आहे. साताराकडे जाणाऱ्या पण बेशिस्त पणे वाहने चालवून दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच नवले पुलावरील 'सेल्फी पॉईंट' पण कायमचा काढून टाकण्यात यावा अशीही मागणी होत आहे.

या नवले पुलाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना पुणे शहराचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहळ '' नवले पुलावरील अपघातांचा विषय आम्ही केंद्राच्या पातळीवर मांडला आहे, तसेच एनएचएआय आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलविण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत'' अस म्हणाले.

 
@@AUTHORINFO_V1@@