''येरवडा कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीला दिवाळीच्या निमित्ताने सुरुवात''

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |

अतुल कुलकर्णी _1 &nb
 
 
 
 

पुणे : सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात लागणार्‍या वस्तूंचे उत्पादन येरवडा कारागृहातील कैदी तयार करतात. यंदाच्या दिवाळीनिमित्त या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आज सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी उदघाटन झाले. येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे दिवाळी सणानिमित्त प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले .


येरवडा कारागृहातील कैद्यामार्फत तयार केलेल्या वस्तूंची विक्री येथील दालनात वर्षभर होत असते. कैद्यांकडून उत्तम दर्जाच्या वस्तू तयार केल्या जातात . करोना महामारीच्या काळात सर्वाधिक नागरिकांनी ऑनलाइन खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या कैद्यांच्या वस्तू ऑनलाइन कशा विकता येतील यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अतुलचंद्र कुलकर्णी यांनी या वेळीज दिली.


येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे ''दिवाळीच्या निमित्त प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित होते.यावेळी अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले की, राज्यातील कारागृहात कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात .

त्यातील एक म्हणजे दिवाळी सणानिमित्ताने लागणार्‍या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री स्टॉल . या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळण्यास मदत होते. मात्र यामधून कैद्यांना स्वतः मध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याची संधी देखील मिळते. ज्यावेळी कारागृहातून कैदी बाहेर पडेल; त्यावेळी त्याच्या हातामध्ये रोजगाराचे साधन असणार, हाच आमचा उद्देश या प्रदर्शनातून आहे. त्यामुळे या प्रदर्शनाचा लाभ पुणेकरांनी अधिकाधिक प्रमाणात घ्यावा,असे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले.



आपल्याला दैनंदिन जीवनात लागणार्‍या वस्तूंचे उत्पादन येरवडा कारागृहातील कैदी तयार करत असतात. यंदाच्या दिवाळी सणानिमित्त या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आज उदघाटन झाले आहे. त्यामध्ये कंदील, पणत्या, सागवानी लाकडी वस्तू, पैठणी, कुर्ता, कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी यासह ७० वस्तू प्रदर्शनात माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यंदा जवळपास १५ ते १६ लाख रुपयांचे उत्पन्न होईल, असा अंदाज येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी प्रदर्शनाचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 
@@AUTHORINFO_V1@@