दिवाळीत फटाक्यांना बंदी पाकचा विजय साजरा करायला संधी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |
Sehwag _1  H x
 

नवी दिल्ली : T20 विश्वचषकात भारताची पाकिस्तानकडून सपशेल हार झाल्यानंतर भारतातील काही भागांत जल्लोष साजरा करण्यात आला. पाकिस्तानने १० विकेटने हा सामना सहज जिंकून भारतासारख्या बलाढ्य संघाला नामोहरम केले. भारताच्या पाचही गोलंदाजांना पाकिस्तानच्या सलामीवीरांना बाद करता आले नाही. मात्र, पाकिस्तानच्या या विजयाचा जल्लोष भारतातील काही मोहल्ल्यांमध्ये झाला. रात्री ११ वाजल्यानंतर काही ठिकाणी जोरदार फटाके फोडण्यात आले.
 
 
या प्रकारानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. "दिवाळीत फटाके उडविण्यासाठी निर्बंध लावण्यात येतात. मात्र, काही भागांत रात्री उशीरापर्यंत फटाके फोडले जात होते. “दिवाळीत फटाके फोडण्यासाठी बंदी आणि पाकिस्तान जिंकला की फटाके फोडण्याची संधी कशी मिळते.", असा प्रश्न त्याने विचारला आहे. दरम्यान, फटाके फोडून ते क्रिकेटचा विजय साजरा करत असतील, करूदेत पण जेव्हा दिवाळी येते तेव्हा मात्र, फटाक्यांमुळे प्रदुषण होते, नुकसान होते, असे संदेश का दिले जातात, असा प्रश्न सेहवागने विचारला आहे.
 
 
केजरीवालांच्या दिल्लीत फुटले फटाके
 
सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. जो दिल्लीतील सीमापुरी भागातील असून पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर रात्री हा जल्लोष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता शशांक शेखर झा यांनी या व्हीडिओद्वारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारला आहे. जर का आपल्या सरकारने दिवाळीनिमित्त फटाके न फोडण्यासाठी प्रतिबंध घातला, तर आपण कोर्टात भेटू, असे खुले आव्हान दिले आहे.
 
 
जर हिंदू सण दिवाळीला हात लावला तर कोर्टात भेटू!

दूरदर्शनचे पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी या व्हीडिओवर टीपण्णी केली आहे. “हा व्हीडिओ राजधानी दिल्लीतील सीमापुरी भागातील आहे. हा भाग मुस्लीमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानच्या जिंकण्यावर इथे आनंद व्यक्त केला जात आहे. असा प्रकार कधीतरी काश्मीरमध्ये होत होता. हा प्रकार आता दिल्लीतही होत आहे. दिवाळीत हिंदू फटाके फोडू शकत नाहीत. पण पाकिस्तानसाठी भारतातील काही जण फटाके फोडू शकतात." तर काहींनी हा व्हीडिओ लन्नाचाही असू शकतो, असा दावा केला आहे.






@@AUTHORINFO_V1@@