अनेक कर्मयोग्यांच्या कष्टांचे फळ म्हणजे उत्तर प्रदेश सरकार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |
modi_1  H x W:

सिद्धार्थ नगर येथून राज्यातील ९ वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार दुहेरी इंजिन सरकार म्हणजे अनेक कर्मयोग्यांच्या दशकांच्या कठोर परिश्रमांचे फलित आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जनतेने सेवेची संधी दिल्यानंतर ते राज्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कठोर परिश्रम करीत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर येथे केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ९ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण केले.
 
 
राज्यातील 9 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे,सुमारे अडीच हजार नव्या खाटा उपलब्ध झाल्या असून, डॉक्टर आणि निम वैद्यकीय वर्गासाठी 5 हजार पेक्षा जास्त नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे शेकडो युवकांसाठी दर वर्षी वैद्यकीय शिक्षणाचा नवा मार्ग खुला झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. मेंदूज्वरामुळे झालेल्या दुःखद मृत्यूमुळे पूर्वीच्या सरकारांनी पूर्वांचलची प्रतिमा खराब केली असे पंतप्रधान म्हणाले. तेच पूर्वांचल, तोच उत्तर प्रदेश पूर्व भारताला आरोग्याची नवी दिशा देणार आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
 
 
राज्यात एकाच वेळी एवढ्या वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण होणे हे अभूतपूर्व असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, असे यापूर्वी न घडण्याचे आणि आता घडत असल्याचे कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय प्राधान्य. राज्यात 7 वर्षांपूर्वी दिल्लीतील आधीची सरकारे आणि 4 वर्षांपूर्वीचे उत्तर प्रदेशातील सरकार मतांसाठी काम करायचे आणि मतांसाठी एखादा दवाखाना किंवा एखाद्या छोट्या रुग्णालयाची घोषणा करून समाधान मानायचे. त्यानंचर वर्षानुवर्षे इमारत बांधली जात नव्हती, इमारत असेल मात्र यंत्रसामुग्री नाही, या दोन्ही गोष्टी आहेत मात्र डॉक्टर आणि इतर कर्मचारी नाहीत . गरीबांकडून हजारो कोटी रुपये लुटणाऱ्या भ्रष्टाचाराचे चक्र अहोरात्र सतत चालत होते. मात्र, योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील कार्यसंस्कृती बदलली असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
 

modi_1  H x W:
 
मेंदूज्वराविरोधात योगी आदित्यनाथ यांचा लढा कौतुकास्पद
 
 
आज उत्तर प्रदेशातील जनता पाहत आहे की, योगी आदित्यनाथ यांना जनतेने सेवेची संधी दिली आणि त्यांनी मेंदूला होणाऱ्या विषाणूच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून या भागातील हजारो मुलांचे प्राण वाचवले. जेव्हा सरकार संवेदनशील असते, गोरगरिबांचे दु:ख समजून घेण्याची करुणेची भावना मनात असते, तेव्हा अशी कार्यपूर्ती घडते, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी योगी आदित्यनाथ खासदार असताना त्यांनी संसदेत मेंदूज्वर संसर्गाचा प्रश्न लावून धरल्याची आठवण सांगितले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@