जिंकण्याचा उत्साहात पाकिस्तानात गोळीबार १२ जण जखमी

25 Oct 2021 17:36:56

pakistan_1  H x



इस्लामाबाद : 
टी-२० विश्वचषकात रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानात जल्लोष सर्वत्र झाला.पाकिस्तानात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाला. इस्लामाबाद, कराची, रावळपिंडीसारख्या मोठ्या शहरांमध्ये गर्दी रस्त्यावर उतरली. हवाई गोळीबार झाला. कराचीमध्ये गोळीबारात १२ जण जखमीही झालेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने एक उपनिरीक्षकही जखमी झाला आहे.

कराचीच्या ओरंगी टाऊनच्या सेक्टर -४ आणि ४ के चौरंगीमध्ये गोळीबारात दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन-ए-इक्बाल येथे झालेल्या गोळीबारात सहभागी असलेल्यांच्या विरोधात कारवाईदरम्यान एका उपनिरीक्षकालाही गोळ्या घालण्यात आल्या. सचल गोठ, ओरंगी टाऊन, न्यू कराची, गुलशन-ए-इक्बाल आणि मालीर येथेही हवाई गोळीबार करण्यात आला. येथेही लोक जखमी झाले.
भारतावरील विजयानंतर पीसीबीचे प्रमुख रमीज राजा सोशल मीडियावर म्हणाले - हा पहिला विजय आहे आणि सर्वात संस्मरणीय देखील आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, ज्यासाठी संपूर्ण टीमचे आभार. ही एक संस्मरणीय प्रवासाची सुरुवात आहे.


पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये प्रथमच भारताला हरवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने १५१ /७ धावा केल्या. कर्णधार कोहलीने ५७ धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ३ बळी घेतले. १५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दणदणीत फलंदाजी करताना सामना एकतर्फी केला.





Powered By Sangraha 9.0