सहावी पुणे डायलॉग ऑन नॅशनल सेक्युरिटी परिषद २८ नोव्हेंबर पासून

25 Oct 2021 21:37:59

पुणे _1  H x W:
 
 
 

पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे पुणे डायलॉग ऑन नॅशनल सेक्युरिटी परिषद ऑनलाईन स्वरूपात २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ''आपत्ती आणि साथीच्या काळात राष्ट्राची सुरक्षा सज्जता हा या वर्षीचा विषय आहे. या परिषदेत नैसर्गीक आणि मानवनिर्मित आपत्ती ह्यांचा व साथीच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा सज्जतेवर होणार परिणाम आणि त्यावरील उपाय ह्यावर दीर्घ चर्चा होईल अशी माहिती पीआयसी चे प्रमुख (निवृत्त) लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी दिली.

या कार्यक्रमाचे उदघाटन देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हस्ते होईल तर त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शात्रज्ञ डॉ,सौम्या स्वामिनाथन यांचे सुरवातीला भाषण होईल. अजित डोवाल आणि डॉ.सौम्या स्वामिनाथन यांच्या बरोबरच नीती आयोगाचे अध्यक्ष डॉ.राजीव कुमार, माजी लष्कर प्रमुख व राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे उपाध्यक्ष जनरल एन.सी.वीज, पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष प्रद्योत हलदर, उपाध्यक्ष केएम सिंह, बालाजी विद्यापीठाचे प्रमुख डॉ.एस.आर.राव, वरा टेकनॉलॉजिचे प्रमुख कर्नल इंदरजीत सिंग, टाटा इन्स्टिटयूट ऑफ जेनेटिक आणि सोसायटीचे संचालक डॉ राकेश मिश्रा आदि मान्यवर पण सहभागी होणार आहेत. पीआयसी तर्फे हाय कार्यक्रमात एक अहवाल तयार करण्यात येणार आहे व ह्या अहवालामुळे राष्ट्रीय संरक्षणाच्या अनुषंगाने धोरणांची आखणी करण्यास प्रशासनला मदत होईल असे मत या वेळीज (निवृत्त) लेफ्टनंट.जनरल विनायक पाटणकर यांनी व्यक्त केले. हे सत्र सर्वांसाठी खुले असून ह्यात राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून मानवनिर्मित आणि निसर्गनिमित्त आपत्तीचा धोका कमी करणे, सीमेवरील शत्रू आणि भविष्यातील धोके आणि भविष्यातील धोक्यांना सामोरे जाताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत हे विषय चर्चीले जाणार आहेत.

 
Powered By Sangraha 9.0