रांजणगाव महागणपतीला १ हजार डाळबींचा नैवेद्य'

25 Oct 2021 19:58:35

महागणपती _1  H
 
 
 

पुणे : हिंदू धर्मात गणपती या देवतेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. हिंदू संस्कृतीत ह्याच गणपतीच्या अष्टविनायकांना पण अन्यनसाधारण महत्व आहे.देशभरातील ,राज्यातील अनेक भाविक ह्या अष्टविनायकांचं दर्शन घायला जात असतात. कोरोनाच्या दुसरऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्यातील मंदिर ६ महिन्यांनसाठी बंद होती. ती राज्य सरकारकडून ७ ऑक्टोबर रोजी उघडली गेली. राज्यात मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली झाल्यानंतर आलेली संकष्टी चतुर्थी व रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ''रांजणगावच्या श्री महागणपतीचे'' भाविकांनी रांगेत उभे राहून मनोभावे दर्शन घेतले.

या वेळी संकष्टी चतुर्थी निमित्ताने 'श्री महागणपतीला' १००१ डाळिंबाचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटेचा अभिषेक , दु. १२ वाजताची महापूजा आणि महानैवेद्य असा कार्यक्रम श्री रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने राबण्यात आला. संकष्ट चतुर्थी निमित्त शेतकरी 'नानाभाऊ दिनकरराव पाचुंदकर' यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली , तर गणेश भक्त आणि कारेगाव ( ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप नवले यांच्या वतीने १ हजार १ डाळिंबाचा महानैवेद्य करण्यात आला.

तर महागणपती सेवा मंडळाच्या वतीने २५ किलो बर्फीचा नैवेद्य श्री महागणपतीला दाखवण्यात आला. संकष्टी चतुर्थी व रविवारची सुट्टी विचारात घेऊन आणि दर्शनासाठी येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेऊन रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर दररोज मंदिर व परिसराची पूर्णपणे साफसफाई आणि सॅनेटायझेशन करण्यात येत असून भाविकांना मास्क बंधनकारक असल्याचे विश्वस्त मंडळाने या वेळेज सांगितले.

 
Powered By Sangraha 9.0