नीरा-भीमाकडून'' उसाला २ हजार ५०० पेक्षा अधिक दर

24 Oct 2021 18:37:00

नीरा भीमा _1  H 
 
 

पुणे: पश्चिम महाराष्ट्र हा उसाच्या लागवडीसाठी सर्वात अनुकल प्रदेश. उसाच्या प्रश्नावरून अनेक प्रकारे राजकारण होताना दिसत. पण बारामती तालुक्यातील ''शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर'' कारखान्याकडून २०२१-२०२२ या चालू गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन २ हजार ५०० पेक्षा अधीक दर देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाजप नेते श्री हर्षवर्धन पाटील यांनी एका बैठकीत केली ;या वेळेज कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष लालासाहेब पवार हे देखील उपस्थित होते. कारखान्याच्या संचालक मंडळाची शनिवारी दिनांक २३ रोजी 'शहाजीनगर' येथे ऊस दरासंदर्भात बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत झाली.


२०२१-२०२२ च्या हंगामात कारखाना ७ लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार आहे. तर इथेनॉलचे १ कोटी ६० लाख लि. सेंद्रिय बॅग २ लाख निर्मितीचे , १५ लाख घनमीटर बायोगॅस निर्मितीचे आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून ४ कोटी ५० लाख युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची देय रक्कम दिवाळीपूर्वी अदा केली जाईल. तसेच कामगारांना ८.३३ टक्के बोनसही देण्यात येईल, असेही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

झालेल्या बैठकीस यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जामदार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड हे देखील उपस्थित होते.

 
Powered By Sangraha 9.0