संविधानापेक्षा मोठा नवाब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2021
Total Views |

Nawab Malik_1  
 
 
मुस्लिमांनी भारतावर ६०० वर्षे राज्य केले, ब्रिटिश देश सोडून गेले त्यावेळी त्यांनी देश जुन्या राज्यकर्त्यांना म्हणजेच मुस्लिमांना द्यायला हवा होता, तसे झाले नाही. पण, म्हणून आम्ही या देशावरील वर्चस्व गमावू इच्छित नाही, यातून देशाच्या मालकीची मानसिकता आली आहे. नवाब मलिकांनी, समीर वानखेडेंना तुरुंगात टाकण्याचे मुजोर विधान त्याच मानसिकतेतून केलेले आहे.
 
 
 
"सर्व प्राणी समान आहेत. पण, काही प्राणी जास्त समान आहेत,” हे ‘अ‍ॅनिमल फार्म’ या जॉर्ज ऑर्वेल यांच्या कालातीत कादंबरीतील वाक्य महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना तंतोतंत लागू पडते. नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ने (एनसीबी) जानेवारीत अटक केली व तेव्हापासून तो आठ महिने कोठडीतच होता, त्याला सप्टेंबरच्या अखेरीस जामीन मिळाला, तर नुकतीच अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचीही ‘ड्रग्ज’ प्रकरणात तुरुंगात रवानगी करण्यात आली. जावयाच्या अटकेने आधीपासूनच तापलेल्या नवाब मलिकांचा आर्यन खानच्या अटकेने जास्तच जळफळाट झाला. त्यावरूनच त्यांनी अटकेची कारवाई करणार्‍या ‘एनसीबी’ अधिकारी समीर वानखेडेंनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा सपाटा लावला. कोरोना-‘लॉकडाऊन’च्या काळात चित्रपटक्षेत्रातील बड्या व्यक्ती मालदीव आणि दुबईत होत्या, त्यावेळी समीर वानखेडे कुटुंबासह तिकडे वसुलीसाठी गेल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. पण, समीर वानखेडे वसुलीसाठी मालदीव वा दुबईला गेल्याची माहिती नवाब मलिकांना मिळाली कशी? की, नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या हेरगिरीसाठी कोणाला तिकडे पाठवले होते? नवाब मलिकांना समीर वानखेडेंच्या हेरगिरीची आवश्यकता का भासली? नवाब मलिकांना समीर वानखेडेंच्या हेरगिरीचा आदेश, अधिकार कोणी दिला? समीर वानखेडेंविरोधात नवाब मलिकांकडे पुरावे असतील तर त्यांनी अजूनही पोलिसांत ‘एफआयआर’ का दाखल केलेला नाही? पोलिसांत गुन्हा दाखल होऊ शकत नसेल, तर नवाब मलिकांनी समीर वानखेडेंविरोधात न्यायालयात दाद का मागितलेली नाही? ‘लॉकडाऊन’ होऊनही कित्येक महिने उलटून गेले, मग नवाब मलिक समीर वानखेडेंना आरोपी ठरवण्यासाठी आतापर्यंत नेमकी कशाची प्रतीक्षा करत होते? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि नवाब मलिकांना या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. केवळ शब्दांचे बुडबुडे उडवून, सणसणाटी माजवून उपयोग नाही, त्यातून काहीही सिद्ध होणार नाही.
 
 
नवाब मलिक फक्त आरोप करूनच थांबले नाहीत, तर “समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय थांबणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी मावळमध्ये आयोजित केलेल्या मुस्लीम समाजाच्या मेळाव्यात भाषण करता करता थेट धमकीही दिली. दुर्दैव म्हणजे, राज्याचा कॅबिनेट मंत्री एका अधिकार्‍याला त्याने बजावलेल्या कर्तव्यामुळे कोठडीत डांबण्याची भाषा करत होता, त्याच वेळी मंचावरील नेते व उपस्थित जनसमुदाय मंत्र्याने फार मोठे मर्दुमकी गाजवणारे विधान केल्याच्या जोशात खुशाल टाळ्या वाजवत होता. ते पाहून त्यांची कीव आल्याशिवाय राहत नाही पण, त्यांचे तसे उत्तेजित होणेही साहजिकच म्हटले पाहिजे. कारण, नवाब मलिक स्वतःला संविधानापेक्षा, कायद्यापेक्षा मोठे समजतात, त्याला त्यांच्या मुसलमान असण्याची पार्श्वभूमी आहे. आर्यन खानच्या अटकेनंतरही तथाकथित धर्मनिरपेक्ष टोळक्याने मुस्लीम व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. अर्थात, ‘आम्ही गुन्हा केला म्हणून नव्हे तर आम्ही मुस्लीम आहोत, म्हणूनच आम्हाला अडकवले जाते, आम्हीच पीडित आहोत,’ असे त्यांना ठसवायचे होते. कोणत्याही गुन्ह्यात मुस्लिमांची अटक झाली की, तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांकडून असेच म्हटले जाते, मग तो गुन्हा बलात्काराचा असो, गोवंश हत्येचा असो, ‘ड्रग्ज’चा असो वा दहशतवादाचा! नवाब मलिकांनीही आपल्या मुस्लीमत्वावरूनच जावई समीर खान आणि आर्यन खानच्या बचावाची, तर ‘एनसीबी’ अधिकारी समीर वानखेडेंना तुरुंगात टाकण्याची भाषा केली व उपस्थित मुस्लिमांनीही त्याला टाळ्यांच्या कडकडाटात अनुमोदन दिले.
 
 
गीतकार जावेद अख्तर यांनी तर आर्यन खानच्या बचावासाठी मिळेल त्या मंचाचा वापर केला. “चित्रपट क्षेत्रातील हाय प्रोफाईल स्थानाची किंमत चुकवावी लागते,” आणि, “एका बंदरावर एक अब्ज डॉलर्सचे ‘कोकेन’ सापडते. पण, त्याची बातमीही येत नाही,” अशी विधाने करत त्यांनी आर्यन खानवरील कारवाई गैर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. ते आर्यन खान शाहरूख खानचा मुलगा असल्याने, दोघेही मुस्लीम असल्यानेच. गेल्या वर्षी सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या मृत्यूवरून धुरळा उडाला होता. पण, त्यावेळी चित्रपटसृष्टीतील दिग्गज, अनुभवी, ज्येष्ठ व्यक्तीच्या नात्याने जावेद अख्तर यांनी आवाज उठवल्याचे दिसले नाही. कारण, मरणारे दोघेही मुस्लीम नव्हते. पण, आज तुरुंगात गेलेला आर्यन खान तसा आहे म्हणून जावेद अख्तरांना कंठ फुटला. सुरुवातीला दिलेले ‘अ‍ॅनिमल फार्म’ कादंबरीतील विधान इथे बरोबर जुळते, मुस्लीम इतरांपेक्षा अधिक समान आहेत! नवाब मलिकांचेही तसेच आहे, त्यांची व जावेद अख्तर यांची मानसिकता एकच आहे. मुस्लिमांनी केलेला मोठा गुन्हाही लहान मानला पाहिजे, अशी ही मानसिकता आहे. मुस्लिमांनी भारतावर ६०० वर्षे राज्य केले. परिणामी, मुस्लीमच या देशाचे मालक आहेत, ब्रिटिश देश सोडून गेले त्यावेळी त्यांनी देश जुन्या राज्यकर्त्यांच्या म्हणजेच मुस्लिमांच्या हाती सोपवायला हवा होता, तसे झाले नाही. पण, म्हणून आम्ही या देशावरील वर्चस्व गमावू इच्छित नाही, यातून ही मानसिकता आलेली आहे, म्हणूनच कायद्यापेक्षाही आमचे मुस्लीम असणे मोठे आहे, अशा अधिकारभावात जावेद अख्तर वा नवाब मलिक बोलत आहेत. नवाब मलिकांनी, समीर वानखेडेंना तुरुंगात टाकण्याचे मुजोर विधान त्याच मानसिकतेतून केलेले आहे.
 
 
पण, नवाब मलिकांनी मस्ती दाखवण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचेही ऐकावे. नवाब मलिकांच्या जावयाकडे काय सापडले पण, ते काय होते हे अप्रत्यक्षपणे पवारांनीच सांगितलेले आहे. ‘एक प्रकारची वनस्पती’ असे शरद पवार म्हणाले पण, त्यांनी त्या वनस्पतीचे नाव घेतले नाही. ती वनस्पती वैध असती तर त्यांनी नाव घेतले असते. पण, त्यांनी नाव घेतले नाही, यावरून ती वनस्पती अवैध असल्याचेच सूचित होते. त्यामुळे नवाब मलिकांनीही ‘ड्रग्ज’ प्रकरणातील जावयाच्या अटकेवरून थयथयाट करू नये, तसेच ‘ड्रग्ज’ प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानचाही बचाव करू नये, तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा, दहशतीखाली आणण्याचा उद्योग करू नये; अन्यथा महाराष्ट्राचा मतदार मुस्लीम वर्चस्ववादी व संविधान-कायद्यापेक्षाही वरचढीच्या मानसिकतेतून समीर वानखेडेंना तुरुंगात टाकण्याची भाषा करणार्‍या नवाब मलिकांनाही घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@