हिंजेवाडीसह सहा गावांसाठी ''नगरपरिषदेचा'' प्रस्ताव

22 Oct 2021 22:58:34

हिंजेवाडी _1  H
 
 
पुणे: हिंजेवाडीसह शेजारील '' मान, मारुंजी, नेरे, नांदे, कसरसाई ह्या गावांची एकत्र मिळून ''नगरपरिषद'' स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे ऑनलाईन बैठकीत पाठवण्यात आला. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आणि पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी पण उपस्थित होते.

परंतु पुणे विभागीय आयुक्त, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त अहवालानंतरच नगरपरिषद स्थापन करण्याची कार्यवाही केली जाईल असे या बैठकीत ठरवण्यात आले .

हिंजेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती आणि तंत्रद्यान सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे मूलभूत सुविधांच्या विकासासाठी नवीन नगरपरिषद स्थापन केल्या शिवाय पर्याय नाही. हिंजवडीसह ६ गावे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अख्यारीत येतात. या सहा गावांचा विकास आराखडा देखील पीएमआरडीए मार्फत तयार आहे.

 
Powered By Sangraha 9.0