प्रविण दरेकर नांदेड दौ-यावर

21 Oct 2021 20:41:51

pravin darekar_1 &nb



मुंबई, दि. २१ ऑक्टोबर :
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे उद्या शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१ रोजी नांदेडच्या दौ-यावर येत आहेत. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर येथील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. तसेच दरेकर येथील कार्यर्त्यांशी संवाद साधणार आहेत व त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


उद्या सकाळी ११ वाजता विरोधी पक्ष नेते दरेकर यांची गोविंद माधव मंगल कार्यालय, देगलूर, जि. नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १२ वा. माळेगाव (मरखेल सर्कल) येथे दरेकर कार्यकर्ता बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता वळग (करडखेड सर्कल) जि. नांदेड येथे दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता रामतीर्थ (रामतीर्थ सर्कल) येथे तर सायंकाळी ५.३० वा. दुगाव (आरळी सर्कल) येथे कार्यकर्त्यांशी दरेकर संवाद साधणार आहेत.
Powered By Sangraha 9.0