चीनला खडसावताना भारतीय राजदूताचा माईक मुद्दामहून केला बंद?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2021
Total Views |
Priyanka _1  H

 
नवी दिल्ली : पाकिस्तानशी मैत्री झाल्यापासून चीन आता रडीचाही डाव खेळायला शिकला आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या बिजिंग येथे संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट कॉन्फरन्समध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारताने चीनच्या बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटीव्ह (BRI) आणि चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरचा (CPEC) मोठा विरोध केला. मात्र, भारतीय राजदूत जेव्हा या वादग्रस्त प्रकल्पावर आपले मत मांडत होत्या त्यावेळेस त्यांचा माईक अचानक बंद झाला.
 
बीजिंगमध्ये सुरू असलेल्या कॉन्फरन्समध्ये भारतीय राजदूत प्रियांका सोहोनी भारतातर्फे चीनच्या BRI प्रकल्पावर आसूड ओढत होत्या. त्यांचे भाषण सुरू असताना अचानक त्यांचा माईक बंद करण्यात आला. माईक सुरू होण्यासाठी वेळ गेला आणि त्यावेळी दुसऱ्या वक्त्यांचा व्हीडिओ सुरू झाला. चीनचा कांगावा लक्षात येताच संयुक्त राष्ट्राचे अंडर-सेक्रेटरी-जनरल लियु झेनमिन यांनी हा व्हीडिओ थांबवत प्रियंका सोहोनी यांना आपले भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली.
 
 
भारताच्या अखंडतेआड येतोय चीनचा प्रकल्प
 
आपल्या भाषणात सोहोनी म्हणाल्या, "या कॉन्फरन्समध्ये बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटीव्हबद्दल बरीच चर्चा झाली होती. या संपूर्ण प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह आहे. भारताला याचा मोठा फटका बसत आहे. चीन-पाकिस्तानच्या आर्थिक वाटाघाटींमुळे भारताच्या अखंडतेला बाधा येत आहे. कुठलाही देश अशा प्रकल्पांवर आक्षेपच घेईल जो त्याच्या अखंडतेच्या आड येईल."
 
काय आहे बेल्ड रोड इनिशिएटीव्ह?
बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटीव्ह चीनचे राष्ट्रपति शी जिनपिंग यांच्या नेतृत्वात २०१३ घोषणा करण्यात आलेल्या या प्रकल्पाकडून चीनला अपेक्षा आहेत. दक्षिणपूर्व आशिया, मध्य आशिया, गल्फ क्षेत्र, आफ्रीका आणि युरोपातील समुद्रावर अधिपत्य स्थापित करण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. ६० अब्ज डॉलर्स इकॉनॉमिक कॉरिडोअर चीनच्या शिंजियांग प्रांतातून पाकिस्तानातील बलूचिस्तानच्या ग्वादर पोर्टला जोडला जातो. हा बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटीव्ह फ्लॅगशिप प्रकल्प आहे.
 
 
 
 
 



 



@@AUTHORINFO_V1@@