गौरवास्पद ! भारतीय सैन्यास युकेमध्ये सुवर्णपदक

21 Oct 2021 16:27:42

GORKHA RIFLE_1  

ब्रेकॉन :  ४/५ गोरखा रायफल्स (फ्रंटियर फोर्स) च्या प्रतिनिधीत्वाने भारतीय सैन्याने"ऑलिम्पिक ऑफ मिलिटरी पेट्रोलिंग"  या यूकेमधील सैनिकी अभ्यासात सुवर्णपदक मिळवले आहे. १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अभ्यासाच्या सहाव्या टप्प्याच्या समाप्तीवर सुवर्णपदक जिंकण्यासाठी वेल्समधील ब्रेकॉन येथे आयोजित केलेल्या 'केंब्रियन पेट्रोल २०२१' या सैनिकी अभ्यासात जी अत्यंत खडतर समजली जाते,त्यात भारताने २०१०,२०१४ आणि आता पून्हा एकदा  २०२१ या वर्षी एकदा सुवर्णपदक मिळविले आहे. यात सैन्य आपल्या पेट्रोलिंगचे कौशल्य दाखवितात, यावर्षी एकूण ९६ देश यात सहभागी झाले होते. ही भारतासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. भारतानंतर रशियानेही अनेक वेळा या सैनिकी अभ्यासात बाजी मारली आहे.१३ आणि १५ ऑक्टोबर या रोजी या सैनिकी अभ्यासाचे काही शेवटच्या कवायती झाल्या. 










Powered By Sangraha 9.0