पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून काश्मीरमध्ये दुबईची गुंतवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2021
Total Views |

Lt _1  H x W: 0



श्रीनगर
: ‘कलम 370’ रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असतानाच संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दुबई शहरानेही काश्मीरमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुबईच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचा मात्र मोठा जळफळाट झाल्याचे चित्र आहे.
 
 
दुबईने काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून जम्मू-काश्मीर प्रशासन आणि दुबई शहर प्रशासन यांच्यात पायाभूत सुविधांच्या बांधकामाबाबत अनेक करार करण्यात आले आहेत. या कराराअंतर्गत दुबई काश्मीरमध्ये ‘आयटी टॉवर’, औद्योगिक उद्याने, ‘लॉजिस्टिक टॉवर्स’ तसेच काश्मीरमध्ये वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये उभारणार आहे.
 
 
काश्मीरमध्ये दुबईने गुंतवणूक न करण्यासाठी पाकिस्तानकडून विविध स्तरांवर अनेक प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, सर्व प्रकारचा विरोध झुगारून दुबईने अखेरीस काश्मीरमध्ये गुंतवणूक केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
 
पाकिस्तानसाठी हा मोठा पराभव
 
पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी दुबई आणि जम्मू-काश्मीर प्रशासन यांच्यातील या कराराला पाकिस्तानचा हा मोठा ‘राजनैतिक पराभव’ म्हटले आहे. हा करार भारतासाठी एक मोठे यश असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.
 



@@AUTHORINFO_V1@@