हिंदूवरील अत्याचारावर बांगलादेश क्रिकेटपटू म्हणाला...

20 Oct 2021 15:47:39

Bangla_1  H x W
नवी दिल्ली : सध्या बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंदूवरील हल्ल्यांचा निषेध होत आहे. बांगलादेशमधील रांगपूर जिल्ह्यामधील हिंदूंच्या वस्तीमधील ६६ घरांवर धर्मांधांनी हल्ला केला. त्यापैकी २० घरे त्यांनी पेटवून दिली. तसेच, दुसरीकडे आयसीसी टी-२० चषक स्पर्धेत बांगलादेश क्रिकेट संघाने स्कॉटलंडविरुद्ध सामना गमावला होता. या दोन्ही घटनांवर बोलताना बांगलादेशचा माजी कर्णधार मुशरफ मुर्तझाने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने देशात झालेल्या हिंदूवरील हल्ल्यांचा निषेध नोंदवला.
 
 
 
मुशरफ मुर्तझाने मंगळवारी फेसबुकवर बंगाली भाषेत पोस्ट करत म्हंटले आहे की, "काल दोन पराभव झाले. एक बांगलादेश क्रिकेट संघाचा पराभव झाला जो फार वेदनादायी होता. दुसरा पराभव हा बांगलादेशचाच झाला, ज्यामुळे माझे हृदय पिळवटून गेले आहे. हा तो हिरवा आणि लाल झेंडा नाही, जो आपल्याला हवा आहे. कित्येक स्वप्न, किती कष्टाने मिळवलेले विजय एका क्षणात नाहीसे झाले. अल्लाह आपल्याला यामधून मार्ग दाखवो हीच इच्छा." अशा भावना व्यक्त करत त्याने निशेष नोंदवला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0