आर्यन खान ड्रग्स प्रकरण : आर्यनच्या जामिनाची 'मन्नत' कधी पूर्ण होणार?

20 Oct 2021 17:28:27

Aryan Khan_1  H
मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा ८ ऑक्टोबरपासून मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणा एनसीबीकडून त्याला अटका करण्यात आली आहे. २० ऑक्टोबर रोजी मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
 
 
 
विशेष न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानचे वकील अमित देसाई, शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा दादलानी उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. तर आर्यनसोबत अटकेत असलेली मुनमुन धमिचाचे वकील अली काशिफ खान हेदेखील तिथे उपस्थित आहेत. आर्यन आणि मुनमुनचे वकील आता एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
 
 
यापूर्वीही म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी सुद्धा आर्यन खान याचा जामीन आर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याच्या जमीन अर्जाला मंजुरी देण्यात आलेली नाही. मुंबईतील स्पेशल एनडीपीएस न्यायालयाच्या वीवी पाटील खंडपीठाने १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या दीर्घ युक्तिवादानंतर जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत. त्यामुळे आर्यन खानसमोरील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0