बांग्लादेशातील हिंदूंना न्याय द्या!

18 Oct 2021 18:32:25

Tripura _1  H x

त्रिपूरा : त्रिपुरातील विचारवंतांच्या शिष्टमंळने शनिवार आगरतला येथे बांग्लादेशचे सहाय्यक उच्चायुक्त मोहम्मद जोबायेद होसेन यांची भेट घेतली. बांग्लादेशात दुर्गा पूजा मंडपाची तोडफोड करणाऱ्यांवर बांग्लादेश सरकारतर्फे कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अगरतला प्रेस क्लबचे अध्यक्ष सुबल कुमार डे यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळाने बांगलादेश सरकारला तिथल्या हिंदूंच्या संरक्षणांसाठी पुरेशी पावले उचपली जावीत, अशी मागणी केली आहे.

“बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांवरील हिंसाचाराच्या वाढत्या घटना बांगडो शेख मुजीबुर रहमान यांच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात आहेत. धर्म हा वैयक्तिक पर्याय आहे परंतु उत्सव सर्वांसाठी आहेत आणि विविध धर्मांचे सर्व लोक एकत्र आल्यामुळे सण अधिक उद्देशपूर्ण आणि आनंदी बनू शकतात, ”असे बांगलादेशी दूताला सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे.

शिष्टमंडळाच्या इतर सदस्यांमध्ये अरुणोदय साहा, त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण नाथ, प्रणव सरकार आणि संजय पॉल यांचा समावेश होता. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 'याच आठवड्याच्या सुरुवातीला कोमिलामध्ये दुर्गा पूजेच्या ठिकाणी झालेल्या अवमानामुळे हिंसाचार उसळला. त्यानंतर मंदिरांची तोडफोड करण्यात आली.'

चांदपूर आणि हाजीगंज उपजिल्ह्यात दुर्गापूजा मंडळांवर झालेल्या हल्ल्यात पोलीस आणि जमावाची चकमक झाली. चांदपूर आणि चिटगांवमध्ये एकूण १६ जणांना ताब्यात घेण्यात आले. हाजीगंज, चांदपूर, नोआखली, कॉक्स बाजार, चॅटोग्राम, चापैनवाबगंज, पबना, मौलवीबझारा आणि कुरीग्राममधून हिंसाचाराच्या घटना घडल्याची नोंद आहे.


Powered By Sangraha 9.0