ठाणे मनपा आयुक्त शिवसेनेत प्रवेश करणार का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021
Total Views |

Thane_1  H x W:
ठाणे : केंद्राकडून मोफत मिळणाऱ्या लसींचे ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना श्रेय लाटत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस संतापली आहे.ठाणे शहरातील नागरिकांचे लसीकरण ठाणे महापालिका करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेना नेत्यांचे पोस्टर्स लागलेत.तेव्हा, ठामपा आयुक्त डॉ.विपिन शर्मा शिवसेनेत प्रवेश करणार का ? असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.कळवा येथे लसीकरणाचे आवाहन करणारे बॅनर अज्ञातांनी फाडल्याचे शनिवारी समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचा पारा चढला.यावर पोलिसांनी कारवाई न केल्यास पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशारा परांजपे यांनी दिला.तर,टीवटीव करून मंत्री जितेंद्र आव्हाडांनीही उग्र भूमिका घेण्याची तंबी पोलिसांना दिली आहे.
 
 
 
कळवा पूर्वेकडील आनंदविहार येथे राष्ट्रवादीने लावलेले कोरोना लसीकरणाचं आवाहन करणारे पोस्टर अज्ञातांनी फाडल्याचे समोर आले. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांचे फोटो होते. हे पोस्टर पहाटे तीन वाजेच्या सुमारास फाडण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या संतापाला आनंद परांजपे यांनी वाट मोकळी करुन दिली. हे बॅनर फाडणार्‍यांवर कळवा पोलिसानी २४ तासात कारवाई करावी. अन्यथा,आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालू.असा इशारा परांजपे यांनी दिला.
 
 
 
तसेच,त्यांनी शिवसेनेचाही खरपुस समाचार घेतला. लसीकरण ठामपा करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेनेच्या नेत्यांचे पोस्टर्स लागलेले आहेत. खा. श्रीकांत शिंदे यांनाही माझा सवाल आहे की, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे मॅन्युफ्रॅक्चरिंग शिवसेनेने सुरु केले आहे का? याचे श्रेय शिवसेनेला नाही, याची जाणीव खा. शिंदे यांनी ठेवावी. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वॉर्डात शिबिरे होतात, त्यावेळी ठामपाचे बॅनर लागतात; ज्यामध्ये महापौर आणि पालिका पदाधिकार्‍यांचे छायाचित्रे असतात. पण, कळव्यात सेनेच्या नेत्यांचे फोटो लावण्याचे कारण काय, पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे लवकरच सेनेत प्रवेश करणार आहात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
ट्वीटरवरून आव्हाडांची धमकी
 
पोस्टर फाडल्याचे कळल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असा दम आव्हाड यांनी दिला आहे.
 
लसीकरणात सेनेचा पक्षपातीपणा उघड
 
लसीकरण मोहिमेत शिवसेनेचा पक्षपातीपणा सुरु असल्याचा जाहीर आरोप भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे व ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि आ.निरंजन डावखरे यांनी केला होता.आता राष्ट्रवादीने आघाडीतील आपल्या मित्रावर शेलक्या भाषेत टिप्पणी केल्याने पक्षपातीपणावर अखेर शिक्कामोर्तब झाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@