सेवानिवृत्तीची रक्कम वेळेत मिळाली असती तर...

16 Oct 2021 16:34:03

Hingoli_1  H x
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यामधील माऊली भागात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी उत्तम काळे यांनी सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने कर्जाची परतफेड करता येत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्यचे सांगण्यात येत आहे. हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या बळसोंड भागातील माऊली नगरात वास्तव्यास असलेले ५९ वर्षांचे उत्तम काळे हे गुरुवारी घरातून फिरायला म्हणून गेले, ते घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला पण ते उशिरा पर्यंत सापडले नाही.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली पोलिस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उत्तम काळे हे एक वर्षापुर्वीच सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर हक्काचे घर असावे, यासाठी त्यांनी वाशीम येथील मोतीलाल ओसवाल फायनांन्स कंपनी यांच्याकडून घरबांधणीसाठी ६.९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्ज फेडीच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली आले होते. त्यांचा शोध सुरु असताना त्यांचा मृतदेह बळसोंड शिवारातील एका शेतात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
 
Powered By Sangraha 9.0